TRENDING:

फोनमध्ये Google आणि Google Chrome अजिबात वापरु नका; Iphone वापरकर्त्यांसाठी 'ॲपल'चा इशारा

Last Updated:
आपण जे काही वापतो त्या सगळ्यावर कोणाचे तरी लक्ष असते, हे तुम्हाला माहीत आहे का? ही अदृश्य नजर असते ती जाहिरात कंपन्यांची. तुमच्या आवडीनिवडी, सवयी, अगदी तुम्ही कोणत्या वेळी जेवण ऑर्डर करता, हे सर्व डिजिटल डेटाच्या रूपात गोळा केले जाते.
advertisement
1/11
फोनमध्ये Google आणि Google Chrome अजिबात वापरु नका; 'ॲपल'चा इशारा
सध्याच्या डिजिटल जगात, आपण सर्वजण स्मार्टफोनवर खूप अवलंबून आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी पाहातच असतो, सर्च करत असतो, आपल्याला पडलेले प्रश्न आणि उत्तरं आपण शोधत असतो. वेगवेगळे ऍप्स कामासाठी वापरतो. यासाठी आपण सर्वात जास्त फोनमध्ये वापरतो ते म्हणजे गुगल सर्च किंवा गुगल क्रोम.
advertisement
2/11
पण आपण जे काही वापतो त्या सगळ्यावर कोणाचे तरी लक्ष असते, हे तुम्हाला माहीत आहे का? ही अदृश्य नजर असते ती जाहिरात कंपन्यांची. तुमच्या आवडीनिवडी, सवयी, अगदी तुम्ही कोणत्या वेळी जेवण ऑर्डर करता, हे सर्व डिजिटल डेटाच्या रूपात गोळा केले जाते.
advertisement
3/11
पण आता या डेटा कलेक्शनच्या खेळाला एका मोठ्या कंपनीने आव्हान दिले आहे. ही कंपनी म्हणजे ॲपल (Apple). ॲपलने आपल्या आयफोन वापरकर्त्यांना (iPhone Users) चक्क गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउझरचा वापर टाळण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
4/11
नेमके काय घडले आहे? ॲपलसारखी कंपनी आपल्या वापरकर्त्यांना इतक्या लोकप्रिय ब्राउझरपासून दूर राहण्यास का सांगत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. चला, या संपूर्ण प्रकरणाची प्रायव्हसी, मैत्री आणि डिजिटल फिंगरप्रिंटच्या दृष्टीने माहिती जाणून घेऊ.
advertisement
5/11
ॲपलचा दावा-सफारी (Safari) जास्त सुरक्षितॲपलचे म्हणणे स्पष्ट आहे गुगल क्रोमच्या तुलनेत त्यांचा स्वतःचा ब्राउझर 'सफारी' (Safari) वापरकर्त्यांची प्रायव्हसी (Privacy) अधिक सुरक्षित ठेवतो.
advertisement
6/11
ॲपलच्या म्हणण्यानुसार सफारी काय करते?सफारी वेबसाइट्स आणि जाहिरातदारांना तुमच्या नावाचा युनिक 'फिंगरप्रिंट' (Unique Fingerprint) बनवण्यापासून थांबवते. म्हणजेच, तुमची वैयक्तिक डिजिटल प्रोफाइल तयार होण्यापासून रोखते.
advertisement
7/11
तुम्ही वेबसाइटवर काय पाहता किंवा काय सर्च करता, याची माहिती जाहिरातदारांना मिळू देत नाही. सफारी एक अशी सिस्टीम तयार करते, ज्यामुळे 'ट्रेक' करणाऱ्यांना सर्व वापरकर्त्यांची प्रोफाइल एकसारखीच दिसते.
advertisement
8/11
ॲपल आणि गुगल यांची दोस्ती तशी खूप जुनी आणि 'घट्ट' आहे.आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक सारख्या ॲपल उत्पादनांमध्ये गुगल हे 'डिफॉल्ट ब्राउझर' (Default Browser) राहण्यासाठी गुगल ॲपलला दरवर्षी अब्जावधी रुपये देते.2021 मध्ये, गुगलने ॲपलला सुमारे $18 बिलियन (जवळपास दीड लाख कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम फक्त डिफॉल्ट ब्राउझरच्या स्थानासाठी दिली होती. याचा एक मोठा पुरावा म्हणजे ॲपलची App Tracking Transparency (ATT) सुविधा. या फीचरने फेसबुकसारख्या कंपन्यांचे ट्रेकिंगचे 'कार्यक्रम' बिघडवले होते. मात्र, गू्गल आणि त्याच्या ॲप्सना या ट्रेकिंग सिस्टीममधूनही सूट देण्यात आली आहे.
advertisement
9/11
'डिजिटल फिंगरप्रिंटिंग' म्हणजे काय?ॲपलच्या या इशाऱ्यामागे गुगलची एक नवी 'खेळी' आहे, डिजिटल फिंगरप्रिंटिंग (Digital Fingerprinting).हा शब्द थोडा क्लिष्ट आहे, पण याचा अर्थ सोपा आहे. जेव्हा तुम्ही कोणताही ॲप वापरता, तेव्हा ते तुमच्या सवयी (उदाहरणार्थ, कोणत्या वेळी तुम्ही फूड ॲपवरून शाकाहारी जेवण ऑर्डर करता) समजून घेते. हाच डेटा गोळा करून तुमचा 'डिजिटल फिंगरप्रिंट' तयार केला जातो. हा फिंगरप्रिंट म्हणजे तुमच्या ऑनलाइन अस्तित्वाची एक युनिक ओळख. या फिंगरप्रिंटच्या आधारेच तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आवडणाऱ्या वस्तूंच्या आणि सेवांच्या जाहिराती येतात.
advertisement
10/11
ॲपलला हे 'सेकंदा-सेकंदाचे ट्रेकिंग' आवडलेले नाही. गुगलने अलीकडेच यूजरच्या डिजिटल फिंगरप्रिंटिंगवरील बंदी हटवली आहे. ॲपलला हे प्रायव्हसीचे उल्लंघन वाटत असल्याने, ते आपल्या वापरकर्त्यांना गुगल क्रोम आणि इतर गूगल ॲप्सचा वापर टाळण्याचा सल्ला देत आहे.
advertisement
11/11
ॲपलने क्रोमचा वापर न करण्याचा सल्ला दिला असला, तरी आयफोन वापरकर्ता करणार काय? सफारी वापरली, तरी सर्च करण्यासाठी पर्याय काय आहे? अजूनही, बहुतेक लिंक्सवर क्लिक करण्यासाठी शेवटी 'गूगल'वर जावेच लागते. ॲपल यावर कोणता तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
फोनमध्ये Google आणि Google Chrome अजिबात वापरु नका; Iphone वापरकर्त्यांसाठी 'ॲपल'चा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल