TRENDING:

PAK vs BAN : मुर्खासारखा रनआऊट झाला सलमान आगा, बांगलादेशच्या बॉलरने वेड्यातच काढलं,नेमकं काय घडलं?

Last Updated:
बांग्लादेशच्या एका बॉलरने सलमान आघाला वेड्यात काढत रनआऊट केले आहे.त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर लाज गेली आहे.
advertisement
1/8
मुर्खासारखा रनआऊट झाला सलमान आगा, बांगलादेशच्या बॉलरने वेड्यातच काढलं,नेमकं काय घडलं?
ढाकाच्या शेरे बांगला स्टेडिअंमवर सूरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 274 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे बांगलादेशसमोर 275 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
2/8
बांगलादेशकडून यावेळी रिषाद होसेनने 3, मेहंदी हसनने 2, तास्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि नाहीद राणाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
advertisement
3/8
या सामन्यात एक मोठा ड्रामा झाला आहे. बांग्लादेशच्या एका बॉलरने सलमान आघाला वेड्यात काढत रनआऊट केले आहे.त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर लाज गेली आहे.
advertisement
4/8
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हरला घडली आहे. ही ओव्हर बांगलादेशकडून मेहदी हसन टाकायला आला होता.मेहदी हसनच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिजवानने नुसता बॉल प्लेस केला होता.
advertisement
5/8
दरम्यान हा बॉल सलमान आगाच्या बाजूला थांबताच त्याने तो उचलून मेहंदी हसनच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात मेहंदी हसनने बॉल हातात घेऊन त्याला रनआऊट केले.
advertisement
6/8
खरं तर सलमान आघाला खेळभावना जपण्याआधी कळायला पाहिजे होतं की आपण क्रिजबाहेर आहोत आणि गोलंदाज याचा फायदा घेऊन आपल्याला रनआऊट करू शकतो.
advertisement
7/8
पण सलमान आघाच्या याकडे लक्ष गेलेच नाही आणि मेहदी हसनने झटकन बॉल हिसकावत त्याला रनआऊट केले होते. दरम्यान मेहदी हसनने अपील करताच अंपायनरे हा निर्णय़ थर्ड अंपायरकडे सोपवला.त्यानंतर थर्ड अंपायरने सलमानला रनआऊट दिले होते.
advertisement
8/8
या निर्णयानंतर सलमान आघा प्रचंड संतापला होता आणि त्याने हेल्मेट काढून मैदानात आपटलं होतं, त्यानंतर त्याने ग्लोव्हज काढून देखील फेकले होते.या दरम्यान सलमान आघा प्रचंड चिडला होता.त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : मुर्खासारखा रनआऊट झाला सलमान आगा, बांगलादेशच्या बॉलरने वेड्यातच काढलं,नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल