उपमुख्यमंत्री अजित पवाराच्या यांच्या धाकट्या लेकाचा बहरीन येथे थाटामाटात विवाह पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अजित पवारांचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय याविषयी अजित पवारांना विचारले असता दादांचा चेहरा चांगलाच खुलला.
advertisement
अजित पवारांची मिश्किल शैली
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. अधिकाऱ्यांना झापणं, पहाटेच्या वेळी पाहणी करणं किंवा मिश्किल प्रतिक्रिया देणं या त्यांच्या कृतींची नेहमीच चर्चा होते. आजही नागपुरातील विधानभवनाच्या आवारात अजित पवारांची मिश्किल शैली पाहायला मिळाली. अजित पवार आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एन्ट्री सुट-बुट परिधान करुन झाली. यावेळी अजित पवारांचा या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना दादा डान्स खूप छान होता, असं म्हणत कौतुक केलं. पत्रकाराने दिलेली दाद ऐकताच दादांचा चेहरा खुलला आणि त्यांनी त्यावर स्मितहास्य केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तर दादा पाय बरा आहे ना, अशी एकाने आपुलकीने चौकशी केली. त्यावर दादांनी हो ठीक आहे.काल स्प्रे मारला म्हणून आज आलो नाही कालपर्यंत जाम होता. माझी काळजी घेता त्यामुळे बरं वाटतं, असं म्हणत दादांनी उपस्थितांची मने जिंकली.
पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण
जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.4 ते 7 डिसेंबर या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे. या सोहळ्याला पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी शेअर केले जय पवार यांच्या लग्नातले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
