ओल्ड इस गोल्ड! मुंबईतील जुने इरानी कॅफे आजही का आहेत No.1? काय मिळते स्पेशल?
Last Updated:
Mumbai Irani Cafes : मुंबईतील इराणी कॅफे आजही जुन्या आठवणी, खास चहा आणि बुन मस्कासाठी प्रसिद्ध आहेत. पारशी-इराणी वारसा, साधं वातावरण आणि पारंपरिक खाद्यपदार्थ यामुळे ही कॅफे मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहेत.
advertisement
1/7

मुंबईतील इराणी कॅफेंची परंपरा आजही तितक्याच प्रेमाने आणि आठवणीने जपली जाते. शहराच्या वाढत्या गगनचुंबी इमारती, आधुनिक कॅफे-रेस्टॉरंट्स आणि फूड चेनच्या गर्दीतही इराणी कॅफेंची ओळख वेगळीच आहे.
advertisement
2/7
चला तर मग आज आपण मुंबई शहरासह त्याच्या उपनगरात असलेल्या काही प्रसिद्ध इरानी कॅफेबदद्लची माहिती जाणून घेऊयात.
advertisement
3/7
बी. मेरवान हे ग्रँट रोड रेल्वे स्टेशनच्या अगदी बाहेर असून तब्बल 110 वर्षांहून जुने आहे. येथे सकाळी 6 ते 7 च्या सुमारास येथे मावा केकसाठी मोठी रांग लागलेली दिसते.
advertisement
4/7
कायनी एंड कंपनी हे मुंबईतील सर्वात जुनं आणि प्रसिद्ध इराणी कॅफे आहे. इथलं उंच छत, जुनं इंटिरिअर आणि क्रिकेटर्सचे फोटो लक्ष वेधतात. येथे तुम्ही खारी, बन मस्का आणि चिकन कटलेट नक्की ट्राय करा, जे येथील खूप लोकप्रिय आहेत.
advertisement
5/7
लाईट ऑफ भारत हा दादरमधील जुनं इराणी कॅफे असून इथला इराणी चहा आणि खिमा पाव खूप प्रसिद्ध आहे. गजबजलेल्या भागात असूनही इथली जुनी चव आजही तशीच टिकून आहे. साधी जागा पण खाण्याची मजा येथे वेगळीच आहे.
advertisement
6/7
कॅफे इराणी चहा हे माहीममधील नवीन पण पारंपरिक शैलीतील कॅफे आहे. भिंतींवर पारशी संस्कृतीची सुंदर चित्रे आणि मजेशीर मेसेज बोर्ड दिसतात. इथली अख्खुरी आणि इराणी ब्लॅक टी खूप लोकप्रिय आहेत.
advertisement
7/7
कोलार अँड को हे किंग्ज सर्कल-माटुंगा परिसरातील ओळखलं जाणारं जुनी शैलीचं इराणी कॅफे आहे. इथलं बन मस्का, इराणी चहा आणि मसाला ऑम्लेट खूप लोकप्रिय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
ओल्ड इस गोल्ड! मुंबईतील जुने इरानी कॅफे आजही का आहेत No.1? काय मिळते स्पेशल?