'तुला मारेन', पंकज त्रिपाठीला फिल्ममध्ये पाहून भडकलेले नाना पाटेकर; सेटवरच भरलेला दम, असं घडलं तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nana Patekar-Pankaj Tripathi: नुकत्याच एका मुलाखतीत नानांनी अशाच एका घटनेचा खुलासा केला, जिथे त्यांनी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांना चक्क मारण्याची धमकी दिली होती. पण असं झालेलं तरी काय?
advertisement
1/10

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयापेक्षाही जास्त त्यांच्या रोकठोक आणि तितक्याच तिखट स्वभावासाठी ओळखले जातात. मनात जे असेल जसंच्या तसं समोरच्याला बोलून दाखवायला नाना कधीच कचरत नाहीत.
advertisement
2/10
नुकत्याच एका मुलाखतीत नानांनी अशाच एका घटनेचा खुलासा केला, जिथे त्यांनी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांना चक्क मारण्याची धमकी दिली होती. पण असं झालेलं तरी काय?
advertisement
3/10
नाना पाटेकरांचा स्वभाव जितका कडक आहेत, तितकेच ते कोमल मनाचे आहेत. इतरांच्या मदतीसाठी धावून जाणे हा त्यांचा जणू हातखंडाच आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'काला' चित्रपटात नाना पाटेकरांनी 'हरिदेव अभ्यंकर' या खलनायकाची भूमिका साकारली होती.
advertisement
4/10
याच चित्रपटाच्या सेटवर जेव्हा नानांनी पंकज त्रिपाठीला पाहिलं, तेव्हा ते थक्कच झाले. पंकज त्रिपाठी सारखा इतका गुणी अभिनेत्याला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत पाहून त्यांना राग अनावर झाला होता.
advertisement
5/10
'काला' या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची अतिशय छोटीशी भूमिका साकारली होती, जी भूमिका कोणाही सामान्य कलाकाराला देता आली असती.
advertisement
6/10
नानांनी पंकज यांना पाहताच विचारलं, "पंकज, तू इथे काय करतोयस?" त्यावर पंकज अगदी साधेपणाने म्हणाले, "सर, एक छोटी भूमिका आहे. तुम्ही आणि रजनीकांत सरांसोबत काम करता येईल म्हणून मी आलो." हे ऐकून नानांचा पारा चढला.
advertisement
7/10
नानांनी पंकज यांना आपल्या खास शैलीत सुनावलं. ते म्हणाले, "तू इतका मोठा अभिनेता आहेस, तू अशा छोट्या भूमिका का करतोस? आमच्यासोबत काम केल्यामुळे तू मोठा होणार नाहीस, तू आधीच तुझ्या कलेने मोठा झाला आहेस. पुन्हा जर तू अशा छोट्या भूमिका स्वीकारल्यास, तर मी तुला धरीन आणि मारेन."
advertisement
8/10
पंकज त्रिपाठी यांनी यावर उत्तर दिलं की, "नाही सर, तुम्ही आहात आणि रजनीकांत अण्णा आहेत, मला तुमच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची इच्छा होती." पण नानांना हे पटलं नाही. त्यांच्या मते, कलाकाराने आपल्या प्रतिभेचा आदर राखायला हवा आणि आपल्या उंचीला साजेसे रोलच निवडायला हवेत.
advertisement
9/10
नाना पाटेकरांच्या या सल्ल्यामागे एक खोल अर्थ होता. त्यांनी स्पष्ट केलं की, कलाकाराने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. केवळ मोठे नट आहेत म्हणून स्वतःची मूल्य कमी करणारी भूमिका स्वीकारणं, हे कलेचा अपमान करण्यासारखं आहे.
advertisement
10/10
पंकज त्रिपाठी यांनी गेल्या काही वर्षांत 'मिर्झापूर'चा कालीन भैया असो किंवा 'स्त्री'मधील रुद्र भैय्या, आपल्या अभिनयाने जे स्थान निर्माण केलंय, त्याचा आदर नानांच्या या शब्दांतून दिसून आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुला मारेन', पंकज त्रिपाठीला फिल्ममध्ये पाहून भडकलेले नाना पाटेकर; सेटवरच भरलेला दम, असं घडलं तरी काय?