TRENDING:

Dhurandhar 2 बॉक्स ऑफिसवर सुसाट! पण OTT वर कधी येणार? रिलीजच्या पहिल्याच दिवशी समोर आली मोठी बातमी

Last Updated:
Dhurandhar 2 OTT Release: प्री-बुकिंगमध्येच 'धुरंधर २: द रिव्हेंज' अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल झालेली पाहायला मिळत आहे. अशातच रिलीजच्या पहिल्याच दिवशी फिल्मच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/9
Dhurandhar 2 ओटीटीवर कधी येणार? रिलीजच्या पहिल्याच दिवशी समोर आली मोठी बातमी
बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' ने रिलीजच्या पहिल्या दिवसांपासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जवळपास ४ तासांची लांबी असणारा हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांनी खिळवून ठेवतोय.
advertisement
2/9
प्री-बुकिंगमध्येच ही फिल्म अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल झालेली पाहायला मिळत आहे. अशातच रिलीजच्या पहिल्याच दिवशी फिल्मच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
3/9
एकीकडे थिएटर्समध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असताना, दुसरीकडे हा चित्रपट घरी बसून कधी पाहता येईल, याची उत्सुकताही चाहत्यांना लागली आहे.
advertisement
4/9
'धुरंधर'चा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच नेटफ्लिक्सवर आला होता. त्यामुळे फिल्मचा दुसरा भागही याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल असं प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, सीक्वलसाठी निर्मात्यांनी आपला पार्टनर बदलला आहे.
advertisement
5/9
'धुरंधर २' आता नेटफ्लिक्सवर नाही, तर जियोहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल १५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
advertisement
6/9
पहिल्या भागाचे राइट्स नेटफ्लिक्सला ८५ कोटींना विकले होते, त्या तुलनेत ही रक्कम जवळपास दुप्पट आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी ओटीटी डील मानली जात आहे.
advertisement
7/9
'धुरंधर २' आज म्हणजेच १९ मार्चला रिलीज झाला आहे. बहुतेकदा कोणताही मोठा चित्रपट थिएटर रिलीजच्या किमान ४५ ते ६० दिवसांनंतर ओटीटीवर येतो. त्यानुसार 'धुरंधर २' जून २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जियोहॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
advertisement
8/9
मात्र, ही खात्रीशीर तारीख नाही. धुरंधरच्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींची कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड पाहता, ही तारीख थोडी पुढेही ढकलली जाऊ शकते.
advertisement
9/9
या सिनेमाने रिलीजच्या आधीच पेड प्रीव्ह्यूमधून ५२.७१ कोटी रुपयांची कमाई करून नवा इतिहास रचला होता. या चित्रपटाला समीक्षकांनीही ३.५ स्टार रेटिंग दिलं आहे. जवळपास ४ तासांचा हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला असून, जगभरातून याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 बॉक्स ऑफिसवर सुसाट! पण OTT वर कधी येणार? रिलीजच्या पहिल्याच दिवशी समोर आली मोठी बातमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल