TRENDING:

कोण आहे Dhurandhar 2 मधला 'बडे साहाब'? साधासुधा अभिनेता नाही, नाना पाटेकर-अनिल कपूरसोबत केलंय काम

Last Updated:
Dhurandhar 2 Bade Sahab: गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, या फिल्मचा खरा व्हिलन म्हणजेच 'बडे साहाब' कोण?
advertisement
1/13
कोण आहे Dhurandhar 2 मधला 'बडे साहाब'? नाना पाटेकर-अनिल कपूरसोबत केलंय काम
संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ती फिल्म थिएटर्समध्ये दाखल झाली आहे. 'धुरंधर २' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी जंग जंग पछाडलं होतं. पहिला भाग रिलीज झाल्यापासूनच धुरंधरच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. अशातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ''धुरंधर २'' चित्रपटगृहात धडकला असून पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरं या भागात पाहायला मिळणार आहेत.
advertisement
2/13
तब्बल साडे तीन तासांच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवलं होतं. प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला होता. अशातच एक पात्र होतं, जे फिल्ममध्ये दिसलं नाही, पण त्याचं नाव सतत घेतलं जात होतं. हे नाव म्हणजे भारतावरील बड्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेला 'बडे साहाब'.
advertisement
3/13
अशातच हा 'बडे साहाब' नक्की कोण आहे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. सोशल मीडियावर या फिल्ममधील अनेक सीन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये 'बडे साहाब' ची झलक पाहायला मिळाली आहे.
advertisement
4/13
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, या फिल्मचा खरा व्हिलन म्हणजेच 'बडे साहाब' कोण? सोशल मीडियावर कधी इमरान हाशमी तर कधी सलमान खानची नावं चर्चेत होती.
advertisement
5/13
पण चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक थक्क झाले आहेत. या सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची म्हणजेच 'बडे साहाब'ची भूमिका कोणत्या बड्या सुपरस्टारने नाही, तर एका कसलेल्या अभिनेत्याने साकारली आहे, ज्यांचं नाव आहे दानिश इक्बाल.
advertisement
6/13
दानिश इक्बाल यांना इतकी मोठी भूमिका दिली, हे अनेकांना रुचलेलं नाही. मात्र दानिश हे कोणते साधे अभिनेते नाहीत, तर अनेक फिल्म्समध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ते केवळ अभिनेतेच नाहीत, तर एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि थिएटर आर्टिस्ट आहेत.
advertisement
7/13
अशातच, ज्या ताकदीने त्यांनी धुरंधर मधील 'बडे साहाब' ची भूमिका साकारली आहे, त्यानंतर त्यांची तुलना थेट 'शोले'च्या 'गब्बर'शी केली जात आहे.
advertisement
8/13
अगदी लहानपणीच दानिश यांनी थिएटरमधून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर भारतातील सर्वात प्रतिष्ठित अशा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. इतकंच नाही, तर अभिनयात पारंगत होण्यासाठी त्यांनी थेट लंडन गाठलं.
advertisement
9/13
लंडनमधील सेंट्रल स्कूल ऑफ स्पीच अँड ड्रामा मधून त्यांनी क्लासिकल ॲक्टिंगमध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. धुरंधरच्या आधी त्यांनी अनेक बड्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. मात्र, धुरंधरमुळे त्यांचं नाव संपूर्ण देशात गाजतंय.
advertisement
10/13
हुमा कुरेशीच्या 'महारानी' या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये त्यांनी 'दिलशाद मिर्झा' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर, नुकत्याच एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेल्या 'संकल्प' सीरिजमध्ये ते नाना पाटेकर आणि संजय कपूर यांच्यासोबत झळकले आहेत.
advertisement
11/13
इतकंच नाही, तर त्यांनी 'अरण्यक', 'आखरी सच' आणि 'भक्षक' यांसारख्या दर्जेदार वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. गेल्या तीन दशकांपासून ते रंगभूमीवर सक्रिय आहेत. त्यांनी १०० हून अधिक नाटकांमध्ये काम केलं असून अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सचाही ते हिस्सा राहिले आहेत.
advertisement
12/13
नुकतंच दानिश एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांना स्वतःलाही सुरुवातीला या भूमिकेच्या लोकप्रियतेबद्दल पूर्ण कल्पना नव्हती. ''धुरंधर २'' च्या शूटिंगदरम्यान 'बडे साहाब'ची ओळख गुप्त ठेवण्यासाठी दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
advertisement
13/13
आदित्य धर यांनी दानिश यांना अंधारात ठेवून त्यांच्याकडून त्यांचा नैसर्गिक परफॉर्मन्स काढून घेतला. मात्र, त्यांच्या पात्राबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता पाहून स्वतः दानिशही थक्क झाले आहेत. सध्या ते त्यांच्या कामाचे होणाऱ्या कौतुकाचा आनंद घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे Dhurandhar 2 मधला 'बडे साहाब'? साधासुधा अभिनेता नाही, नाना पाटेकर-अनिल कपूरसोबत केलंय काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल