DIY Paper Soap : साबणाचे तुकडे वापरून बनवा पेपर सोप! मुलांना अॅक्टिव्हिटी म्हणून करायला लावा, पैसेही वाचवा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Reuse of soap scraps : घरात बऱ्याचदा साबण संपत आल्यावर त्याचे तुकडे उरतात. हे तुकडे वापरताही येत नाहीत कारण ते खूप लहान असतात आणि ते आपल्याला फेकूनही द्यावेसे वाटत नाही. अशावेळी तुम्ही या साबणानाच्या तुकड्यांचा एक स्मार्ट वापर करू शकता. याने तुमचे पैसेही वाचतील
advertisement
1/7

साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून तुम्ही पेपर सोप बनवू शकता. या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुम्ही मुलांनाही सामील करून घेऊ शकता. त्यांचाही यामध्ये चांगला वेळ जाईल, ते एन्जॉय करतील आणि तुमचे पेपर सोप विकत घेण्याचे पैसेही वाचतील.
advertisement
2/7
यासाठी तुम्हाला साबणाचे उरलेले तुकडे, थोडे कोमट पाणी, कोणताही कागद आणि एक ब्रश लागेल. याच साहित्यात तुमचे पेपर सोप बनून तयार होतील. चला पाहूया पेपर सोप बनवण्याची पद्धत.
advertisement
3/7
सर्वात आधी उरलेले साबणाचे तुकडे घ्या. ते चांगले किसून बारीक करा. तुम्हाला ते किसायचे नसेल तर त्याचे अगदी लहान लहान तुकडे करा. यानेही तुमचं काम होईल.
advertisement
4/7
आता साबनाच्या तुकड्यांमध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालून घट्ट पेस्ट तयार होईपर्यंत चांगले एकत्र करा. पेस्ट खूप पातळ किंवा खूप घट्ट होऊ देऊ नका. नाहीतर पेपर सोप बनवणं अवघड होऊ शकतं.
advertisement
5/7
पेस्ट बनल्यानंतर कोणताही कागद घ्या आणि त्यावर एका बाजूला ब्रशच्या साहाय्याने साबणाची पेस्ट व्यवस्थित लावा. नंतर कागदाच्या मागच्या बाजूलाही अशाच प्रकारे साबणाची पेस्ट लावून घ्या.
advertisement
6/7
आता साबणाची पेस्ट लावलेले हे कागद 15-20 मिनिटे उन्हात किंवा पंख्याखाली वाळू द्या. साबणाचा पहिला थर वाळल्यानंतर जसे आपण आधी केले होते, त्याचप्रकारे पुन्हा या कागदांवर दुसरा थर लावा. यानंतर पुन्हा ते कागद उन्हात किंवा पंख्याखाली व्यवस्थित वाळू द्या.
advertisement
7/7
उन्हात हे कागद लवकर सुकतात, तर पंख्याखाली त्याला सुकायला 3-4 तास लागू शकतात. कागद वाळल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात पेपर सोप कट करून घ्या. मुलांना स्टार, सर्कल, स्क्वेअर असे शेप आवडतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
DIY Paper Soap : साबणाचे तुकडे वापरून बनवा पेपर सोप! मुलांना अॅक्टिव्हिटी म्हणून करायला लावा, पैसेही वाचवा