TRENDING:

Tilgul Ladoo Recipe Tips : तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात? मग 'या' छोट्या चुका टाळा आणि घरीच बनवा मऊ लाडू

Last Updated:
How to Make Soft Til Ladoo : अनेकांना तर असाही अनुभव आला असेल की लाडू इतका कडक होतो की तो वरवंटा किंवा दगडाने तोडावा लागतो. यामागे नेमकं कारण काय असेल? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो, त्यामुळे ते मग तिळाचे लाडू करायला कचरतात आणि त्यापेक्षा विकत आणलेलेच बरं असं त्यांना वाटतं.
advertisement
1/8
तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात? मग 'या' छोट्या चुका टाळा आणि घरीच बनवा मऊ लाडू
मकर संक्रांत जवळ आली की घराघरात तिळाचा सुवास दरवळू लागतो. "तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला" म्हणत आपण एकमेकांना लाडू देतो. पण अनेकदा हे लाडू बनवताना मनात एक धाकधूक असते. कारण हे लाडू कधीकधी तर चांगले बनतात. पण अनेकदा ते जास्तच कडक होतात. अनेकांना तर असाही अनुभव आला असेल की लाडू इतका कडक होतो की तो वरवंटा किंवा दगडाने तोडावा लागतो. यामागे नेमकं कारण काय असेल? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो, त्यामुळे ते मग तिळाचे लाडू करायला कचरतात आणि त्यापेक्षा विकत आणलेलेच बरं असं त्यांना वाटतं.
advertisement
2/8
खरंतर लाडू नरम होणार की कडक हा सगळा खेल पाकावरच आहे, त्याचं गणित जरा इकडे तिकडे झालं की झालं. मग ते लाडू खायला कडक होतात. कधी कधी तर लाडू वळता वळता मिश्रण इतकं कडक होतं की त्याचे लाडूच वळले जात नाहीत. तुमच्या बाबतीतही असं झालंय का? मग अजिबात काळजी करू नका. काही साध्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचे लाडूही अगदी मऊ होतील.
advertisement
3/8
1. सगळ्यात महत्त्वाचं गुळाची निवडआपण बाजारात जातो आणि कोणताही गूळ घेऊन येतो. पण लाडूसाठी 'चिक्कीचा गूळ' वेगळा असतो. जर तुम्ही साधा गूळ वापरत असाल, तर तो जास्त उकळल्यामुळे लाडू कडक होतात. त्यामुळे शक्यतो सेंद्रिय किंवा लाडूसाठीचा खास गूळ वापरा. तो कापून किंवा किसून घेतल्यास पाकात गुठळ्या होत नाहीत.
advertisement
4/8
2. पाकाची चाचणीलाडू कडक होण्याचं मुख्य कारण म्हणजे पाकाचा अतिरेक. पाक जास्त झाला की लाडू दगडासारखे होतात.कसं तपासावं? गूळ विरघळला की एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात पाकाचा एक थेंब टाका. जर त्या थेंबाची मऊ गोळी झाली, तर समजा पाक तयार आहे. जर ती गोळी कडक झाली किंवा पाण्यात आवाज आला, तर समजा पाक जास्त गरम झालाय आणि आता लाडू कडक होणार.
advertisement
5/8
3. त्या एका चमचा तुपाची जादूअनेकजण फक्त गूळ आणि तीळ वापरतात. पण पाकात थोडं तूप टाकल्यास लाडूला छान चकाकी येते आणि ते मऊ राहायला मदत होते.काय कराल? गुळाचा पाक तयार होत असताना त्यात अर्धा ते एक चमचा साजूक तूप आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. सोड्यामुळे पाक हलका होतो आणि लाडू खुसखुशीत होतात.
advertisement
6/8
4. तीळ भाजताना घाई नकोतीळ जर नीट भाजले गेले नाहीत, तर लाडू खाताना चिवट लागतात.मंद आचेवर तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घ्या. जास्त भाजले तर ते कडवट लागतात, त्यामुळे लक्ष असू द्या.
advertisement
7/8
5. मिश्रण हाताबाहेर गेल्यावर काय करावं?लाडू वळता वळता जर मिश्रण कडक झालं आणि लाडू वळले जात नसतील, तर घाबरून जाऊ नका. पुन्हा एकदा कढई मंद आचेवर गरम करायला ठेवा. मिश्रण थोडं कोमट झालं की त्याचे लाडू सहज वळता येतात.
advertisement
8/8
एक छोटीशी चूक जी आपण नेहमी करतो...आपण अनेकदा खूप मोठ्या आचेवर पाक बनवतो आणि डब्यातलं काम उरकायला जातो. तिथेच घात होतो. पाक एका सेकंदात बदलतो. त्यामुळे जेव्हा पाक बनवताय, तेव्हा पूर्ण लक्ष कढईतच ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tilgul Ladoo Recipe Tips : तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात? मग 'या' छोट्या चुका टाळा आणि घरीच बनवा मऊ लाडू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल