TRENDING:

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण शोधताय? पुण्यातील हे 5 ठिकाणं बेस्ट ऑप्शन!

Last Updated:
Valentines day 2025 : जगभरात सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण हे अनेक जण शोधत असतात.
advertisement
1/7
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी निसर्गरम्य वातावरण शोधताय? 5 ठिकाणं बेस्ट ऑप्शन
फेब्रुवारी महिना सुरु झाला की तरुणाईला उत्सुकता असते ती व्हॅलेंटाईन डे ची. जगभरात सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे.
advertisement
2/7
यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण हे अनेक जण शोधत असतात. तर तुम्ही पुण्यात आहात आणि हे डेज साजरे करण्यासाठी काही ठिकाण शोधत असाल? तर हे ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत.
advertisement
3/7
मुळशी धरण - मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. निसर्गाच्या हिरवाईने वेढलेले मुळशी धरण आणि तलाव हे निसर्गप्रेमी जोडप्यांसाठी एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. सुर्यास्ताच्या वेळी येथील नजारा अतिशय मोहक असतो.
advertisement
4/7
पवना धरण - लोणावळ्याजवळ असलेल्या पवना धरण परिसर अतिशय निसर्गरम्य असून आल्हाददायक वातावरण इथे पाहायला मिळत. त्यामुळे तुम्ही इथे व्हॅलेंटाईन डे निमित्त फिरायला जाऊ शकता. पवना धरण परिसरात कॅम्पिंगची सुद्धा सुविधा आहे. ज्यासाठी पर्यटक खास येतात. शहरापासून हे ठिकाण अगदी जवळच आहे.
advertisement
5/7
एम्प्रेस गार्डन - एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक उद्यान आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचा सर्वांचा अनुभव घेता येतो. तब्बल दोनशे वर्षांचा वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह अनेक देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डनमध्ये देखील तुम्ही छान प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.
advertisement
6/7
एफसी रोड आणि कोरेगाव पार्क कॅफे - पुणे शहरातील तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेली ही ठिकाणे वेळ घालवण्यासाठी परफेक्ट असलेली जर्मन बेकरी, कॅफे पाश, आणि बरेच स्टायलिश आणि शांत कॅफे येथे आहेत.
advertisement
7/7
लोणावळा - तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमँटिक डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही लोणावळ्याला भेट देऊ शकता. हे पुण्यापासून आणि मुंबईपासूनही जवळ आहे. सोबतच थंडगार वारा आणि मनाला भावणार वातावरण हे इथं पाहायला मिळत. व्हॅलेंटाईन डे साठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. त्यामुळेच तुम्ही देखील अशा विविध ठिकानांना भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण शोधताय? पुण्यातील हे 5 ठिकाणं बेस्ट ऑप्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल