TRENDING:

Kolhapur Tourism: कुठं गोवा अन् महाबळेश्वर करताय? उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहा कोल्हापुरातील ही फेमस ठिकाणं

Last Updated:
Kolhapur Tourism: उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतात. कोल्हापुरात पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
advertisement
1/9
कुठं गोवा अन् महाबळेश्वर करताय? उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहा कोल्हापूरची ही ठिकाण
उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. त्यामुळे दहावी, बारावी आणि शाळांच्या परीक्षा झाल्या की अनेकजण बाहेर पडतात. कोल्हापूर जिल्हा पर्यटकांचं नेहमीच आकर्षण केंद्र राहिला आहे. आपण देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचा प्लॅन करत असाल तर कोल्हापुरातील ही 8 ठिकाणे पाहायलाच पाहिजेत.
advertisement
2/9
अंबाबाई मंदिर : कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला या दिवसात अनेक पर्यटक भेट देत असतात. चालुक्य कालखंडातील हे ऐतिहासिक मंदिर स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.
advertisement
3/9
रंकाळा : अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ असणारा रंकाळा तलाव हे ठिकाण देखील पर्यटकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव आहे. या तलावाचा सुंदर असा नजारा, तलावाच्या बाजूने तटबंदी आणि बगीचा, खाण्यापिण्याच्या विविध पदार्थांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूकच या ठिकाणी वळतात.
advertisement
4/9
टेंबलाई मंदिर, टेंबलाईवाडी रोड : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले टेंबलाई मंदिर या ठिकाणाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. शहराच्या अगदी जवळच हे शांत असे एक ठिकाणी आहे. या टेंबलाई टेकडीवर टेंबलाई किंवा त्र्यंबोली देवीचे आणि यमाई देवीचे मंदिर आहे.
advertisement
5/9
न्यू पॅलेस : नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस हे देखील एक संग्रहालय आहे. कसबा बावडा रोडवर असणारा हा राजवाडा म्हणजे आजचे, श्रीमंत शाहू महाराजांचे निवास्थान आहे. तर राजवाड्याच्या आतील बाजूस राजर्षी शाहू महाराजांच्या वस्तू संग्रालयासाठी जागा केली आहे. इथं लागूनच एक बाग असून त्या बागेत प्राणी संग्रहालय आहे.
advertisement
6/9
टाऊन हॉल : कोल्हापूर शहरातच असणारे टाऊन हॉल हे वस्तुसंग्रहालय अतिशय उत्तम माहितीचे भांडार आहे. या वस्तुसंग्रहालयामध्ये जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात.
advertisement
7/9
बुद्धकालीन लेणी, पोहाळे : श्री क्षेत्र जोतिबा येथे वडणगे, कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथील बुद्धकालीन लेणी हे देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे. कोल्हापूरपासून 15 किमी अंतरावर ही लेणी आहेत. रोडवरून थोड्या आतल्या बाजूला गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत या लेणी पाहता येतात.
advertisement
8/9
गगनगिरी आश्रम मठ, गगन बावडा रोड : कोल्हापूर शहरापासून 60 किमी अंतरावर असणारा गगनबावडा तालुक्यात गगनगिरी महाराजांचा मठ देखील उत्तम पर्याय आहे. या ठिकाणाहून दिसणारे निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी सर्वत्र हिरवी चादर पांघरलेले डोंगर बघून मन प्रसन्न होऊन जाते.
advertisement
9/9
चिन्मय गणेश, टोप : पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक उंचच उंच गणेशमूर्ती दिसते. चिन्मय मिशनने कर्नाटकातून 50 कारागीरांकडून 18 महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे. 24 फूट उंचीच्या ध्यानगृहावर ही 61 फूट उंच अशी बैठी गणेशमूर्ती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Kolhapur Tourism: कुठं गोवा अन् महाबळेश्वर करताय? उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहा कोल्हापुरातील ही फेमस ठिकाणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल