पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? छत्रपती संभाजीनगर आहे बेस्ट! या 10 पर्यटनस्थळांना द्या भेट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
तुम्हाला वन डे ट्रिप जायचं असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तर ही 10 ठिकाणी कोणती आहेत याविषयीच माहिती जाणून घेऊयात.
advertisement
1/11

पावसाळा सुरू झालेला आहे. सर्वत्र आता छान थंडगार आणि हिरवं वातावरण पाहिला मिळतं आहे. अशा हिरव्या वातावरणात जर तुम्हाला वन डे ट्रिप जायचं असेल तर तुम्ही <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तर ही 10 ठिकाणी कोणती आहेत याविषयीच माहिती जाणून घेऊयात.
advertisement
2/11
अजिंठा लेणी ह्या सोयगाव तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात ह्या लेणी आहेत. यात 29 बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या लेणी म्हणून अजिंठाची ओळख आहे.
advertisement
3/11
वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे
advertisement
4/11
बीबी का मकरबा या वास्तूला बांधण्यास सतराव्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं. तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा आहे.
advertisement
5/11
रशियामधील गझनवाद येथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी पाणचक्की बांधली. या ठिकाणी सरया (धर्मशाळा) मशीद पाण्यासाठी भला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे. पानचक्की सुमारे 17 व्या शतकातील आहे. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते.
advertisement
6/11
अंतूर किल्ला हा अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे. मराठा सरदाराने या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. हा किल्ला काही दिवस निजामांचा ताब्यामध्ये सुद्धा होता.
advertisement
7/11
दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. 11 व्या शतकात यादव राजा भिल्लमा पाचवा याने हा किल्ला बांधला होता. किल्ला जिथे आहे त्या जागेला पूर्वी देवगिरी या नावाने ओळखले जात.
advertisement
8/11
डोंगरात खोदलेली छत्रपती संभाजीनगरमध्ये बौद्ध लेणी आहे. ही लेणी बीबी का मकबरऱ्यापासून काही अंतरावर असून, याठिकाणी देखील पर्यटकांची वर्दळ असते.
advertisement
9/11
छत्रपती संभाजीनगरपासून 50 किलोमीटरवर असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा मातीचा धरण म्हणून ओळख असलेला जायकवाडी धरण आहे. या ठिकाणी देखील तुम्ही एका दिवसात जाऊन परत येऊ शकते. अतिशय निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असत. या ठिकाणी धरण आहेस पण या ठिकाणी तुम्ही संत एकनाथ महाराजांचा भव्य मंदिर देखील आहे या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकतात.
advertisement
10/11
पितळखोरा लेणी कन्नडपासून 18 किमी आणि संभाजीनगरपासून 77 किमी अंतरावर, पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंबाला गावाजवळील चांदोरा टेकडीवर वसलेली एक प्राचीन खडक कापलेली लेणी आहे. पितळखोरा 14 बौद्ध लेण्यांचा समावेश आहे.
advertisement
11/11
म्हैसमाळ हे मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणून ओळख आहे. शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर अतिशय नयनरम्य वातावरण होतं. या ठिकाणी अनेक पर्यटक आहे पावसाळ्यात आवर्जून जात असतात. या ठिकाणी तुम्हाला गिरिजा देवीचा मंदिर देखील बघायला भेटेल आणि त्यासोबतच प्राचीन बालाजीचे मंदिर देखील या ठिकाणी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? छत्रपती संभाजीनगर आहे बेस्ट! या 10 पर्यटनस्थळांना द्या भेट