रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ट्रेन चार्ट तयार झाल्यावरही मिळणार तिकीट, काय आहे प्रोसेस?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या वतीने प्रवाशांसाठी आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. यामध्ये जर एखाद्या प्रवाशाला ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर चार्ट तयार झाल्यावरही रेल्वेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिकाम्या बर्थची माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. (भरत कुमार चौबे/सीतामढी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

ही सुविधा हाजीपूर रेल्वे झोनमध्ये सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी पाचही रेल्वे मंडळात आता फेसबुक आणि एक्सवर ट्रेनच्या रिकाम्या सीटबाबत माहिती दिली जाणार आहे. आता घरी बसलेल्या प्रवाशांना ट्रेनच्या रिकाम्या सीटची माहिती चार तास आधीच कळणार आहेत. तसेच कोणत्या ट्रेनमध्ये कोणत्या वर्गात (क्लासमध्ये) किती जागा खाली आहेत, हे प्रवाशांना कळणार आहे.
advertisement
2/5
रिझर्व्हेशन चार्ट तयार केल्यावर रिकाम्या जागांचे वाटप केले जाते. ‘आजचे आरक्षण’ यामध्ये ऑनलाइन रिझर्व्हेशन होत नाही. त्यासाठी स्टेशनवरील आजच्या आरक्षण काउंटरवर जावे लागते.
advertisement
3/5
दानापूर रेल्वे विभागातून निघणाऱ्या गाड्यांची सद्यस्थिती काय आहे, याबाबतची माहिती देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. जिथून ट्रेन निघेल तिथूनच करंट रिझर्व्हेशन करता येईल. सोबतच ट्रेन लेट झाल्यावर ट्रेन कुठल्या स्टेशनवरुन जात आहे, याचीही माहिती मिळेल. याशिवाय कोणती स्पेशल ट्रेन कुठून कुठून आणि कोणत्या दिवशी चालवली जात आहे, याची माहितीही येथे दिली जात आहे.
advertisement
4/5
ट्रेन रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर, सर्व क्लासेसमध्ये रिक्त राहिलेल्या जागांची संपूर्ण माहिती एक्स आणि फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलवर दिसेल. आजचे आरक्षण, चालू तिकीट आणि तत्काळ आरक्षण तिकीट यात फरक आहे.
advertisement
5/5
ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी तत्काळ तिकीट बुक करता येते. तर चालू तिकीटसाठी त्या ट्रेनचा चार्ट तयार होण्याची प्रतीक्षा करावी लागते. चार्ट तयार केल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांच्या आजच्या आरक्षणाला चालू आरक्षण (करंट रिझर्व्हेशन) म्हणतात. तसेच आता फेसबुकवरही स्टेटस शेअर केले जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ट्रेन चार्ट तयार झाल्यावरही मिळणार तिकीट, काय आहे प्रोसेस?