trip in summer : उन्हाळ्यात ट्रीपला जायचा प्लान करताय? तर मग ही ठिकाणं आहे बेस्ट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या सर्वत्र परीक्षाही संपल्या आहेत. त्यामुळे अनेक जण विविध ठिकाणी उन्हाळ्यात ट्रिपला जायचे प्लान करतात. तुम्हालाही जर उन्हाळ्यात ट्रिपला जायचे असेल तर कोणती ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट असतील, हे आज आपण जाणून घेऊयात. (सोनिया मिश्रा, प्रतिनिधी)
advertisement
1/5

उन्हाळ्यात पर्यटकांचा ओढा हा उत्तराखंडकडे असतो. उत्तराखंडमधील चमोलीत काही ठिकाणे हे पर्यटकांसाठी बेस्ट आहेत. यामध्ये चमोली जिल्ह्यातील निजमुला घाटी सप्तकुण्ड हे एक बेस्ट टूरिस्ट स्पॉट आहे. हे ठिकाण जोशीमठच्या निजमुला घाटीत असलेल्या झींझी गावापासून फक्त 24 किमी अंतरावर आहे. सुमारे 5 हजार मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण मंत्रमुग्ध करणारे आणि रोमांचित करणारे आहेत. साहसी पर्यटन आणि डोंगर दऱ्यांच्या प्रेमींसाठी ते स्वर्गापेक्षा कमी नाही.
advertisement
2/5
चमोली जिल्ह्यातील जोशीमठपासून 19 किलोमीटर दूर अंतरावर हिमालयी अल्पाइन गवताचे मैदान आहे. याला गोर्सो/गोरसों या नावाने ओळखले जाते. बुग्याल हे एक स्कीइंग स्थळ आहे, ज्याची सरासरी उंची सुमारे 3056 मीटर आहे. वसंत ऋतूमध्ये हा परिसर सर्व बाजूंनी हिरव्या गवताने व्यापलेला असतो. तर हिवाळ्यात येथे अनेक फूट बर्फ पडतो. त्यावर सूर्यप्रकाश पडला की, ही बुग्याल चांदीसारखी चमकते. बुग्याल म्हणजे दाट शंकूच्या आकाराचे जंगले आणि ओक वृक्षांनी वेढलेले हिरवेगार गवताळ प्रदेश आहे.
advertisement
3/5
जर तुम्हाला घनदाट जंगलात जायला आवडत असेल तर चमोली जिल्ह्यातील अली बुग्याल हे ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी, तुम्हाला ग्वालदम राष्ट्रीय महामार्गावरील कर्णप्रयागपासून 70 किलोमीटरचे अंतर पार करावे लागेल. ते पार केल्यानंतर तुम्ही देवाल येथे पोहोचाल. देवालपासून 30 किलोमीटरचे अंतर पार केल्यावर तुम्ही शेवटच्या वाण गावात पोहोचाल. याठिकाणी नंदा देवीचा भाऊ लाटू देवतेचे मंदिर आहे. वाण गावातून आली बुग्यालचा रस्ता जवळ येतो.
advertisement
4/5
जर तुम्हाला अतिशय शांत ठिकाणी जायचे असेल तर चमोली जिल्ह्यातच माता अनुसूया मंदिरापासून 5 किमी अंतरावर अत्रि मुनि आश्रम आहे. याठिकाणी ‘अमृत गंगा’ नावाचा झरा आहे. अशी मान्यता आहे की, याठिकाणी या गंगेची उत्पति माता अनुसूयेने केली होती. तसेच भारत वर्षाची ही एकमेव गंगा आहे, ज्याची परिक्रमा केली जाऊ शकते.
advertisement
5/5
चमोलीच्या देवाल ब्लॉकच्या लोहाजंग भैंकलताल- ब्रह्मताल ट्रॅक आणि मोनाल ट्रॅक म्हणजे उन्हाळ्यात पर्यटकांसाठी पर्वणीच असते. जर तुम्हालाही लांब ट्रेकिंगला जायचे असेल तर भगवान ब्रह्माला समर्पित असलेला ब्रह्मताल ट्रॅक तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. याठिकाणी तुम्हाला अतिशय सुखद असा अनुभव येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
trip in summer : उन्हाळ्यात ट्रीपला जायचा प्लान करताय? तर मग ही ठिकाणं आहे बेस्ट