ट्रेन तिकीट खरेदी केल्यावर सर्वात आधी करा हे काम; मग ते फाटलं, हरवलं तरी टेन्शन नाही
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रत्येक दिवशी भारतात लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक दिवशी लाखो तिकीटे खरेदी केली जातात. जे लोक स्मार्टफोन वापरत नाहीत, ते काऊंटर तिकीट खरेदी करतात. यामुळे अनेकदा विविध कारणांमुळे काही वेळे तिकीट हरवून जाते किंवा फाटते. त्यामुळे प्रवासी घाबरतात आणि मग पर्यायी व्यवस्था शोधतात. वेळ मिळाला नाही तर विना तिकीटही ट्रेनमध्ये प्रवास करतात आणि टीटीपासून बचाव कसा होईल, याचा प्रयत्न करतात. (शिखा श्रेया/रांची, प्रतिनिधी)
advertisement
1/6

मात्र, काही उपाय माहिती आहेत, ते जर तुम्ही केले तर घाबरण्याची काही आवश्यकता नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही काऊंटर तिकीट खरेदी करत असाल तेव्हा सर्वात आधी एक काम करावे. असे केल्याने तुमचे तिकीट हरवले, फाटले तरी तुम्हाला प्रवास करता येईल आणि त्यासाठी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. विशेष म्हणजे तुम्हाला टीटीही पकडणार नाही. ही पद्धत नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
2/6
रांची रेल्वे मंडळाचे वरिष्ठ डीसीएम निशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेकदा असे होते की, तुमचे तिकीट फुकट जाते किंवा हरवते किंवा तुम्ही कुठे ठेऊन देतात आणि तुम्हाला ते मिळत नाही, अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
advertisement
3/6
त्यांनी सांगितले की, ट्रेन तिकिट हरवल्यावर ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांना जास्त घाबरण्याची गरज नाही. ते आपला पीएनआर नंबर टाकून ऑनलाइन तिकीट टीटीला दाखवू शकतात. तसेच जे ऑफलाइन तिकीट घेतात, त्यांनी आपला पीएनआर नंबर कुठेतरी स्वत:जवळ लिहून घ्यावा.
advertisement
4/6
पीएनआर नंबर असल्याने तुम्हाला असा फायदा होईल की, तुम्ही तिकीट हरवल्यानंतरही तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाऊन ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकतात. सोबतच, टीटीलासुद्धा पीएनआर नंबर सांगून तिकीट काढायला सोपे होईल.
advertisement
5/6
तिकीट हरवल्यावर ट्रेन नंबर आणि वेळ लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही त्या ट्रेनमध्ये चढून जावे आणि आपले नाव आणि वय टीटीला सांगावे, ते तुम्हाला तुमच्या बर्थबाबत संपूर्ण माहिती देतील. त्यावेळी तुमच्याजवळ तुमचे आधार कार्ड किंवा कोणतेही प्रुफ असणे महत्त्वाचे आहे.
advertisement
6/6
तुम्ही तुमचे डुप्लीकेट तिकीटही काढू शकतात. यासाठी तुम्हाला 50 ते 150 रुपयांपर्यंत चार्ज द्यावा लागेल. हा चार्ज तुम्ही स्लीपर, सेकंड क्लास किंवा एसी यापैकी कशामध्ये ट्रॅव्हल करत आहात, यावर ठरेल. जर स्लीपरमध्ये असेल तर त्याचा चार्ज 50 रुपये असेल आणि एसी तिकीट असेल तर तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
ट्रेन तिकीट खरेदी केल्यावर सर्वात आधी करा हे काम; मग ते फाटलं, हरवलं तरी टेन्शन नाही