गूळ-फुटाणे दिल्याने बरा होतो जुनाट खोकला, डांग्या मारुती मंदिराची अनोखी आख्यायिका
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Temple Legend: जालना जिल्ह्यात एक हनुमान मंदिर असून डांग्या मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं. इथं गूळ-फुटाणे अर्पण केल्याने जुनाट खोकला बरा होतो, अशी आख्यायिका आहे.
advertisement
1/9

आपल्या देशात अनेक पुरातन मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराशी संबंधित एखादी आख्यायिका देखील असते. जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथे असेच एक पुरातन हनुमान मंदिर आहे. याच डांग्या मारुती मंदिराशी जोडलेली आख्यायिका देखील अशीच आहे.
advertisement
2/9
एखाद्या व्यक्तीला बरेच दिवस खोकला असतो. अनेक उपचार करून देखील हा खोकला बरा होत नाही. तेव्हा लोक या डांग्या मारुती मंदिरात येतात. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातून लोक या ठिकाणी येतात.
advertisement
3/9
या ठिकाणी मारुतीला गुळ फुटाणे अर्पण केल्यानंतर कितीही जुनाट प्रकारचा खोकला असल्यास तो बरा होतो, अशी गावकऱ्यांची सजमूत आहे. याबाबत लोकल18 ने थेट येथील गावकऱ्यांशी संवाद साधला.
advertisement
4/9
जालना जिल्ह्यातील मौजपुरी हे एक छोटस गाव आहे. या गावात प्रत्येक गावात असतं असं एक मारुतीचं मंदिर देखील आहे. परंतु, गावापासून थोड्या अंतरावर शेतामध्ये डांग्या मारुती म्हणून प्रसिद्ध असं पुरातन मंदिर आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूला धांडेगाव शिवारात दुसरे एक मारुतीचे मंदिर आहे.
advertisement
5/9
दोन्ही मारुतीच्या मंदिराच्या ठिकाणी जुन्या काळातील दोन मंदिरे आहेत. प्लेग किंवा अन्य साथींमध्ये गावातील गावकरी मरण पावले असतील व केवळ हे मारुतीची मंदिरेत शिल्लक राहिली असतील, अशी गावकऱ्यांची धारणा आहे.
advertisement
6/9
या दोन्ही मारुतींना डांग्या मारुती म्हणून ओळखलं जातं. कितीही जुनाट प्रकारचा डांग्या खोकला असल्यास या दोन मारुतींना गूळ फुटाणे अर्पण केले जातात. या गूळ फुटाणे खाल्याने हा खोकला बरा होतो, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
advertisement
7/9
परिसरातील नागरिकांबरोबर दूरच्या शहरातून लोक या ठिकाणी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी व गूळ फुटाणे अर्पण करण्यासाठी येतात. मौजपुरी येथील मारुती मंदिरात यंदा जीर्णोद्धार होणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला इथे मोठा कार्यक्रम असणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
advertisement
8/9
कुणाला जुनाट खोकला असेल आणि तो राहत नसेल तर ते इथं येतात. देवाला गूळ व फुटाणे अर्पण करतात. तसेच मंदिराच्या शिखरावर गुळ फुटाणे फेकतात व ते हाताने झेलतात. हे गूळ फुटाणे खाल्ल्याने जुनाट प्रकारचा खोकला नाहीसा होतो, असे मंदिराचे पुजारी राम बळप यांनी सांगितलं.
advertisement
9/9
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
गूळ-फुटाणे दिल्याने बरा होतो जुनाट खोकला, डांग्या मारुती मंदिराची अनोखी आख्यायिका