वर्षाअखेर फिरायला जायचा बेत करताय? कोल्हापुरातील ही 5 ठिकाणे बेस्ट पर्याय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Kolhapur Tourism: कोल्हापुरात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. आपणही वर्षाअखेर सुट्ट्यांत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही 5 ठिकाणे पाहाच.
advertisement
1/7

निसर्ग सौंदर्याने नटलेला, करवीर काशी म्हणून ओळख असलेला, छत्रपतींची राजधानी म्हणून ओळख असलेला, संपूर्ण जगाला पुरोगामीत्वाचा संदेश देणारा, सांस्कृतिक कला क्रीडा अशा क्षेत्राला वाव देणारा असा हा कोल्हापूर जिल्हा. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटनासाठी म्हटलं तर बारमाही हा जिल्हा बहरलेला असतो. आता वर्षाअखेरीस आणि नववर्षाच्या स्वागताला अनेकजण बाहेर पडतात. कोल्हापुरातील ही 5 ठिकाणे त्यांनी पाहिलीच पाहिजेत.
advertisement
2/7
पन्हाळा : किल्ले पन्हाळगड, हे कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांच्या यादीतील एक सर्वात प्रसिद्ध नाव आहे. डोंगरावर वसलेला पन्हाळा किल्ला आणि मुळातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांना बघण्यासारखी बरेचशी ठिकाणे आहेत. छ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला, परिसरातील इतिहसाच्या खुणा, तिथं असणारे बगीचे आणि डोंगरावरुन दिसणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी किल्ले पन्हाळ्याला आवर्जून भेट द्यायला हवी.
advertisement
3/7
जोतिबा : अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जोतिबाचं दर्शन घेणं हा सुद्धा अनेकांसाठी आनंददायी क्षण असते. पन्हाळ्यानंतर एक प्रमुख थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या वाडी रत्नागिरीत अनेक भाविक आणि पर्यटक येत असतात. नववर्षाचं स्वागत जोतिबा दर्शन घेऊन संस्मरणीय करण्यासाठी अनेकजण इथं येतात.
advertisement
4/7
कणेरी मठ : कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे कोल्हापुरात येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. ग्रामीण भागातील जीवनाचे दर्शन या ठिकाणी मूर्तीच्या स्वरुपात होते. ऐतिहासिक मंदिरांबरोबर या परिसरात 4डी, 7डी मध्ये लघुपट पाहणे, हॉरर हाऊस, हॉल ऑफ मिरर यासारखे आधुनिक गोष्टी देखील पाहायला मिळतात.
advertisement
5/7
बुद्धकालीन लेणी, पोहाळे : श्रीक्षेत्र जोतिबा या ठिकाणी कोल्हापूर-वडणगे-कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथे डोंगरात कोरलेली बुद्धकालीन लेणी लागतात. हे ठिकाण देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे. कोल्हापूरपासून 15 किमी अंतरावर ही लेणी आहेत. वाडी रत्नागिरीतून थोड्या खालच्या बाजूला गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत ही लेणी निदर्शनास पडतात.
advertisement
6/7
करुळ घाट : कोल्हापुरातील गगनबावडा तालुका म्हणजे महाराष्ट्राचे चेरापूंजी म्हणून ओळखले जाते. याच गगनबावड्यात सन 1968 पासून करुळ घाटातून वाहतुक सुरू आहे. कोल्हापूर-विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात हा 13 कि. मी. अंतराचा घाट आहे. पावसाळ्यात इथून प्रवास करण्याचा एक खास अनुभव असतो. ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये येत असाल तर इथं कुटुंबासोबत एकदा तरी यायलाच हवं.
advertisement
7/7
या 5 ठिकाणांसोबतच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, टाऊन हॉल म्युझियम या ठिकणांना देखील भेट देता येऊ शकते. प्रत्येक ठिकाणचा अनुभव खास असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
वर्षाअखेर फिरायला जायचा बेत करताय? कोल्हापुरातील ही 5 ठिकाणे बेस्ट पर्याय