हम्पी ते वेरुळ लेणी, ‘हे’ आहेत जगभरातल्या पुरातन वास्तूंचे अवशेष, पाहा photos
- Published by:News18 Lokmat
- trending desk
Last Updated:
जगभरात अनेक आश्चर्य लपलेली आहेत. त्यात काही पुरातन वास्तूंचे अवशेषही आहेत. या जागा पर्यटकांना अचंबित करतात. भारतातल्या हंपी, वेरूळ लेण्यांसारखी पुरातन ठिकाणं किंवा माचू-पिचूचे चमत्कार, स्टोनहेजचं रहस्य अशा काही जागा जगात त्यांच्या पुरातन आणि गूढ इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. ‘न्यूजेबल एशियानेट न्यूज’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.
advertisement
1/8

इंकन सिटाडेल हे अँडीज पर्वतांमध्ये वसलेलं आहे. याला माचू पिचू असं म्हटलं जातं. 15 व्या शतकातल्या पुरातन संस्कृतीच्या खुणा इथं पाहायला मिळतात. हे ठिकाण पेरू देशात आहे. इथं अत्याधुनिक दगडी बांधकाम पाहायला मिळतं.
advertisement
2/8
अंगकोरवाट ही मंदिरं ख्मेर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. त्यांचं सुशोभित नक्षीकाम आणि गॅलरी हिंदू महाकाव्यं आणि खगोलीय प्रतिमा दर्शवतात. कंबोडिया देशामध्ये हे ठिकाण आहे. ही जगातली सर्वांत भव्य धार्मिक वास्तूरचना आहे. इथं हिंदू-बौद्ध मंदिरं आहेत. बाराव्या शतकाच्या सुरुवातीला या वास्तू उभारल्याचा अंदाज आहे.
advertisement
3/8
स्टोनहेंजची भव्य दगडांची गोलाकार व्यवस्था 4,500 वर्षांपूर्वीची आहे. हे ठिकाण नेमकं खगोलशास्त्रीय वेधशाळा की धार्मिक स्थळ होतं, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ही वास्तू इंग्लंडमध्ये आहे. यात गोल आकारात उभे भरपूर मोठे व वजनदार दगड वापरण्यात आले आहेत.
advertisement
4/8
ज्वालामुखीच्या खडकात कोरलेल्या, वेरूळची गुहांतील लेणी कधी कोरल्या असाव्यात याचा शोध घेतल्यास तो पाचव्या ते 10व्या शतकापर्यंत मागे जातो. या वास्तूशिल्पात हिंदू, बौद्ध आणि जैन कलांचं मिश्रण आहे.
advertisement
5/8
अक्रोपोलिस हे प्राचीन ग्रीक संस्कृतीचं प्रतीक आहे. डोरिक आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना असलेल्या पार्थेनॉनचे वर्चस्व असलेलं, हे अथेनाचं स्मारक आहे.
advertisement
6/8
मायन संस्कृतीचं केंद्र, चिचेन इत्झा इथं असलेला एल कॅस्टिलो पिरॅमिड हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार आहे. त्यातले इक्विनॉक्स पिरॅमिडमधून उतरणाऱ्या सापासारखा सावलीचा भ्रम निर्माण करतात.
advertisement
7/8
पेट्रा ही नबेटियन राजधानी होती. या वास्तूचा प्रतिष्ठित दर्शनी भाग या प्राचीन वाळवंटी शहरात येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करतो. इथं अनेक समाधी आणि मंदिरं आढळतात.
advertisement
8/8
हंपी या प्राचीन शहराचे अवशेष विजयनगर साम्राज्याची कथा सांगतात. इथं विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर व दगडी रथ आहे. भारताच्या कर्नाटक राज्यात हे पुरातन शहर आहे. हजारो हेक्टर जागेवर इथं पुरातन मंदिरं व इमारतींचे अवशेष सापडले आहेत. युनेस्कोनं जागतिक वारसास्थळांच्या यादीत या ठिकाणाला समाविष्ट केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
हम्पी ते वेरुळ लेणी, ‘हे’ आहेत जगभरातल्या पुरातन वास्तूंचे अवशेष, पाहा photos