TRENDING:

पन्नाशीपार कोल्हापूरकरांचं भारत दर्शन, सायकलवरून करणार तब्बल इतका प्रवास

Last Updated:
कोल्हापूरच्या चांगभलं ग्रुपमधील पन्नाशीपार तरुण सायकलवरून भारत भ्रमंती करत आहेत.
advertisement
1/7
पन्नाशीपार कोल्हापूरकरांचं भारत दर्शन, सायकलवरून करणार तब्बल इतका प्रवास
<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> पन्नाशीपार तरुणांनी एक अनोखी मोहीम हाती घेतलीय. 7 जण सायकलवरून भारत भ्रमंतीस निघाले आहेत.
advertisement
2/7
चांगभलं ग्रुपमधील 7 जण काश्मीर ते कोल्हापूर ते कन्याकुमारी असा तब्बल 3800 किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन पूर्ण करणार आहेत.
advertisement
3/7
अविनाश बोकील (71 वर्षे), वसंतराव घाटगे (67 वर्षे), महिपती संकपाळ (65 वर्षे), निशिकांत साळवेकर (59 वर्षे), रामनाथ चोडणकर (55 वर्षे), धैर्यशील पाटील (55 वर्षे), आकाश रांगोले (46 वर्षे) या सात जणांनी ही सायकल स्वारी सुरू केली आहे.
advertisement
4/7
नुकतेच श्रीनगरमधील लाल चौक येथून त्यांनी प्रस्थान केले असून एक एक राज्य पार करत ते कोल्हापूरकडे येत आहेत.
advertisement
5/7
17 डिसेंबर पर्यंत कोल्हापुरात येण्याचे सर्व सायकलस्वारांचे नियोजन आहे. तर पुढे लगेचच ते कोल्हापुरातून कन्याकुमारीला जायला निघतील.
advertisement
6/7
'सायकल चालवा, आरोग्य चांगले ठेवा, प्लॅस्टिक टाळा, प्रदूषण टाळा, भारत स्वच्छ अभियान' असे पर्यावरणविषयक संदेश देत सायकलस्वारी त्यांनी सुरु केली आहे.
advertisement
7/7
श्रीनगर येथील कोल्हापूरचे जवान पांडुरंग गायकवाड यांचे सर्व सायकलस्वारांना सहकार्य लाभले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
पन्नाशीपार कोल्हापूरकरांचं भारत दर्शन, सायकलवरून करणार तब्बल इतका प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल