TRENDING:

'अर्धवट नात्यात राहण्यापेक्षा...', मृणाल ठाकूरला प्रेमात मिळालेला धोका, अभिनेत्रीला सोडून पळून गेलेला बॉयफ्रेंड

Last Updated:
Mrunal Thakur Boyfriend: पडद्यावर अनेकदा प्रेमकहाण्या जगणारी मृणाल खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाच्या बाबतीत काहीशी दुर्दैवी ठरली.
advertisement
1/8
मृणाल ठाकूरला प्रेमात मिळालेला धोका, अभिनेत्रीला सोडून पळून गेलेला बॉयफ्रेंड
मराठी मालिकांपासून भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या यशाच्या शिखरावर आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवा असोत किंवा तिचे सुपरहिट चित्रपट, मृणाल कायमच चर्चेत असते.
advertisement
2/8
पडद्यावर अनेकदा प्रेमकहाण्या जगणारी मृणाल खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाच्या बाबतीत काहीशी दुर्दैवी ठरली. एका प्रसिद्ध युट्युबरशी बोलताना मृणालने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल एक असा धक्कादायक खुलासा केला आहे, जो ऐकून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.
advertisement
3/8
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत मृणालने आपल्या तुटलेल्या नात्याचा भावनिक प्रवास मांडला. तिने सांगितलं की, तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून चक्क पळून गेला होता. त्याचं कारणही तितकंच विचित्र होतं.
advertisement
4/8
तो तिला म्हणायचा, "तू खूप इम्पल्सिव्ह (उतावीळ) आहेस, मला तुझ्या या स्वभावाचा सामना करणं कठीण जातंय. मुख्य म्हणजे, तू एक अभिनेत्री आहेस आणि मला अभिनेत्रीसोबत कसं वागायचं किंवा हे जग कसं हाताळायचं, हे कळत नाहीये."
advertisement
5/8
मृणालने अत्यंत समंजसपणे या परिस्थितीचं वर्णन केलं. ती म्हणाली, "मी त्याला दोष देत नाही. तो एका जुन्या विचारांच्या आणि पुराणमतवादी कुटुंबातून आला होता. त्यामुळे त्याच्या संगोपनाचा तो भाग होता. पण एक प्रकारे, ते नातं तिथेच संपलं हे चांगलंच झालं."
advertisement
6/8
मृणालने या ब्रेकअपकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं आहे. ती म्हणाली, "जर आमचं लग्न झालं असतं, तर भविष्यात मुलांच्या संगोपनावरून आमचे वैचारिक खटके उडाले असते. वडिलांचे विचार वेगळे आणि आईचे वेगळे, यामुळे मुलांची मोठी गोची झाली असती. त्यामुळे अर्धवट नात्यात राहण्यापेक्षा वेगळं होणं कधीही उत्तम!"
advertisement
7/8
मृणालचा प्रवास पाहिला तर थक्क व्हायला होतं. 'कुमकुम भाग्य'सारख्या गाजलेल्या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर 'सुपर ३०', 'बॅटल हाऊस', 'जर्सी' आणि 'सीता रामम' यांसारख्या चित्रपटांनी तिला स्टारडम मिळवून दिलं.
advertisement
8/8
अलीकडेच ती 'सन ऑफ सरदार २' मध्ये दिसली असून, २० फेब्रुवारीला तिचा 'दो दीवाने सहर में' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आज मृणाल केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर साऊथमध्येही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अर्धवट नात्यात राहण्यापेक्षा...', मृणाल ठाकूरला प्रेमात मिळालेला धोका, अभिनेत्रीला सोडून पळून गेलेला बॉयफ्रेंड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल