TRENDING:

नव्या वर्षाच्या स्वागताला ट्रेकिंगचा विचार करताय? कोल्हापुरातील हे 5 किल्ले बेस्ट पर्याय!

Last Updated:
Kolhapur Forts: नव्या वर्षाच्या स्वागताला अनेकजण ट्रेकिंग करत किल्ल्यांवर जाण्याच्या विचारात असतात. कोल्हापुरातील हे 5 किल्ले तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहेत.
advertisement
1/7
नववर्षाच्या स्वागताला ट्रेकिंगचा विचार करताय? कोल्हापूरचे 5 किल्ले बेस्ट पर्याय!
नव्या वर्षाच्या स्वागताला अनेकजण बाहेर पडतात. काहीजणांचा निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या गड-किल्ल्यावर जाण्याचा बेत असतो. तर काहीजण त्यासाठी ट्रेकिंगचाही विचार करतात. तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर कोल्हापुरातील हे 5 किल्ले आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहेत.
advertisement
2/7
पावनगड: सह्याद्री डोंगररांगांमध्ये असलेल्या पन्हाळा तालुक्यातील पावनगडाला फार मोठे महत्त्व आहे. हा पवनगड पन्हाळगडाचा जोडकिल्ला असं म्हटलं जातं. पन्हाळगडाला जोडूनच शिवरायांनी हा गड इ. स. 1673 मध्ये बांधून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या पावनगडावरील थंडगार वारा उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतो. येथे आल्यावर पर्यटक सुखावतो. निश्चितच भेट द्यावी असाच हा गड आहे.
advertisement
3/7
विशाळगड: कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असाच एक किल्ला कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे. तो किल्ला म्हणजे ‘विशाळगड किल्ला’ होय. पूर्वी हा किल्ला ‘खेळणा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता. कोल्हापूर पासून साधारण 76 किलोमीटर अंतरावर शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला आहे.
advertisement
4/7
सामानगड: कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या गडांपैकी आणखी एक गड म्हणजे ‘सामानगड’ होय. येथील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, गर्द राई आणि थंडगार वारा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आल्हाददायक वातावरणामुळे येथे अनेक योगशिबिरे आयोजित केली जातात. गडहिंग्लज तालुक्यात असणारा हा किल्ला कोल्हापुरातून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे.
advertisement
5/7
पारगड: कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगररांगांनी व्यापलेला आहे. या डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले वसलेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा आणि अत्यंत दुर्गम भागात चंदगड तालुक्यात असलेला किल्ला म्हणजे ‘पारगड’ होय. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि सिंधुदुर्गचा परिसर नजरेच्या कवेत घेणारा हा ‘किल्ले पारगड’ कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर उंच मैदानी पठारावर दिमाखात विसावलेला आहे. कोल्हापूरहून 146 कि.मी. अंतरावर चंदगड आहे. चंदगडहून 33 कि.मी. अंतरावर ‘पारगड’ आहे.
advertisement
6/7
रांगणा किल्ला: कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ 15 किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘रांगणा’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात ‘प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर सत्ताधीश’ असे संबोधले जाते. कोल्हापूरहून दक्षिणेला 96 किमी अंतरावर गर्द राईत रांगणा किल्ला वसलेला आहे.
advertisement
7/7
कोल्हापूर स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 13 किल्ले आहेत. या किल्ल्यांनी अनेक राजवटींचा इतिहास पाहिलाय. जर तुम्ही निसर्गप्रेमी, शिवप्रेमी असाल किंवा अभ्यासक असाल तर इतिहासाची साक्ष देणारे आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे किल्ले आवर्जून पाहावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
नव्या वर्षाच्या स्वागताला ट्रेकिंगचा विचार करताय? कोल्हापुरातील हे 5 किल्ले बेस्ट पर्याय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल