TRENDING:

photos : लेडी ट्रक ड्रायव्हरची कमाल, स्वत:च्या वाहनालाच बनवले vanity van, सुविधा पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..

Last Updated:
तुम्ही चित्रपट अभिनेते, अभिनेत्री यांची व्हॅनिटी व्हॅन पाहिली असेल. यामध्ये झोपण्यापासून ते जेवणापर्यंतच्या, तसेच अंघोळीचीही व्यवस्था असते. मात्र, यानंतर आका एका महिलेने आपल्याच देशी ट्रकला हौस म्हणून त्याला चालते-फिरते घर बनवले आणि यामुळे ही महिला सर्वत्र प्रसिद्ध झाली. (अंजलि सिंह राजपूत/लखनऊ, प्रतिनिधी)
advertisement
1/9
लेडी ट्रक ड्रायव्हरची कमाल, स्वत:च्या वाहनालाच बनवले vanity van, सुविधा पाहून...
जलजा यांच्या ट्रकमध्ये बेड आहे. या बेडवर दोन ते तीन जण आरामात झोपू शकतात. सोबत पाण्यासाठी 300 लीटरची टाकीही आहे. कीचन आहे. तसेच एक नव्हे तर दोन एसी आहेत.
advertisement
2/9
केरळमध्ये ट्रेक लेडी या नावाने प्रसिद्ध असलेली जलजा ही महिला आहे. बुधवारी त्या लखनऊ येथे पोहोचल्या. येथील प्रसिद्ध अयप्पा मंदिरात प्रदक्षिणा करण्यासाठी केरळमधील प्रसिद्ध दगड कृष्ण शिला आणणे, हे इथे येण्याचे निमित्त होते.
advertisement
3/9
लखनौच्या या मंदिरात त्यांनी कृष्णशिळा आणताच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी त्यांची मुलगी देविका आणि त्यांचे पतीही उपस्थित होते.
advertisement
4/9
जलजा यांनी सांगितले की, त्यांना काश्मिरला जायची इच्छा झाली होती. मात्र, त्यांच्या पतीकडे केरळहून विमानाने किंवा इतर कोणत्या वाहनाने काश्मिरची ट्रिप फिरण्यासाठी तितके पैसे नव्हते.
advertisement
5/9
अशावेळी त्यांच्या पतीने त्यांना सांगितले की, आपला ट्रकचा व्यवसाय आहे. तुला ट्रक चालवता येते. ट्रेक घेऊनच काश्मिरला जा.
advertisement
6/9
या दरम्यान, त्या पतीच्या सल्ल्यावरुन ट्रक घेऊन काश्मिरला गेल्या. यानंतर आता मागील 2 वर्षांपासून त्या संपूर्ण भारतात या ट्रकला फिरवत आहेत.
advertisement
7/9
आतापर्यंत त्यांनी 28 राज्ये आणि भूतानचाही प्रवास केला आहे. यासाठी त्यांनी या ट्रकलाच घर बनवले. यामध्ये राहण्यापासून ते खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे.
advertisement
8/9
ट्रक लेडी जलजा यांनी सांगितले की, 7 दिवस आणि जवळपास 2 हजार किलोमीटरचा प्रवास करुन लखनऊ येथे कृष्ण शिळा आणण्याचे भाग्य मिळाले. आता येथून त्या अयोध्येला जाणार आहात. त्यानंतर मग घरी केरळला परततील.
advertisement
9/9
मंदिराचे जनरल सेक्रेटरी ओमाना कुट्टन यांनी सांगितले की, भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे दगड मंदिराच्या परिक्रमेवर ठेवण्यात येणार आहेत. सबरीमाला मंदिरात जे दगड बसवले आहेत, तेच दगड आता इथेही बसवले जाणार असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
photos : लेडी ट्रक ड्रायव्हरची कमाल, स्वत:च्या वाहनालाच बनवले vanity van, सुविधा पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल