TRENDING:

Pune Tourism : श्रावणातलं पर्यटन! पुण्यातील ही 5 प्रसिद्ध ठिकाणं पाहिली का? एकदा पाहाल तर नेहमी जाल!

Last Updated:
Pune Tourism: पुणे हे महाराष्ट्रातील एक मोठे आणि ऐतिहासिक शहर आहे. पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या तालुक्यांमध्ये समृद्ध निसर्ग आहे. खास करून पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यात हे निसर्ग सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे या काळात भेट द्यावीत अशी 5 प्रसिद्ध ठिकाणे पाहुयात.
advertisement
1/5
श्रावणातलं पर्यटन! पुण्यातील ही 5 प्रसिद्ध ठिकाणं पाहिली का? एकदा पाहाल तर...
सिंहगड किल्ला: पुणे शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक सिंहगड किल्ला आहे. सिंहगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक ऐश्वर्य लाभलेले आहे. सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे यांची समाधी आणि देव टाकी या ऐतिहासिक वास्तू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सोबतच किल्ल्यावर मिळणारी झुणका भाकरीची मेजवानी आनंद द्विगुणित करते.
advertisement
2/5
लोणावळा: लोणावळा हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई आणि पुणे ह्या दोन मोठ्या शहरांच्या मध्य भागावर लोणावळा हे हिलस्टेशन आहे. पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणावळ्यात 2 तासांचा प्रवास करून पोहोचता येते. टायगर पॉईंट, ओसंडून वाहणारे धबधबे आणि थंड वातावरण पर्यटनासाठी आकर्षित करतं.
advertisement
3/5
लवासा सिटी : लवासा हे पुण्यातील मुळशी तालुक्यातील मोसे व्हॅलीमध्ये बांधले गेलेलं नियोजित शहर आहे. लवासा सिटी ही इटालियन शहर पोर्टोफिनोवर आधारित बांधले गेलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पुण्यापासून लवासा सिटी 60 किलोमीटर अंतरावर आहे. लवासामध्ये वर्षभर हवामान चांगले असते. इथे वॉटरस्पोर्टस, सनसेट आणि विविध गोष्टीचा आनंद घेऊ शकता.
advertisement
4/5
भीमाशंकर: भीमाशंकर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे जे, पुणे जिल्ह्याचा आजबाजूच्या डोंगर रांगेत वसलेले आहे. भीमाशंकर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भव्य शिवमंदिर आहे. सोबतच वन्यजीव अभयारण्य देखील आहे. भीमाशंकर पर्यटनात भोरगिरी किल्ला, गुप्त भीमाशंकर, निसर्ग परिचय केंद्र, कोकण व्ह्यू पॉईंट आणि सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.
advertisement
5/5
राजगड किल्ला: पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेला राजगड किल्ला श्रावणातील पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथं भेट दिलीच पाहिजे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची येथून सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. राजगड किल्ल्यावर असलेले पद्मावती मंदिर हे एक आकर्षक स्थान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Pune Tourism : श्रावणातलं पर्यटन! पुण्यातील ही 5 प्रसिद्ध ठिकाणं पाहिली का? एकदा पाहाल तर नेहमी जाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल