TRENDING:

Mumbai Tourism: मुंबईत हे नाही पाहिलं, तर पाहिलं काय? पावसाळी पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं!

Last Updated:
Mumbai Tourism: पावसाळ्यात पर्यटनासाठी अनेक मुंबईकर आवर्जून बाहेर पडतात. त्यांनी पर्यटनाची ही 5 फेमस ठिकाणं पाहिलीच पाहिजेत.
advertisement
1/7
मुंबईत हे नाही पाहिलं, तर पाहिलं काय? पावसाळी पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं!
पावसाळा सुरु होताच संपूर्ण मुंबईत एक नवा उत्साह निर्माण होतो. पावसाच्या सरी, थंड वारे आणि निसर्गाची नवलाई अनुभवण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटक शहरातील काही खास ठिकाणांकडे वळतात. अशाच मुंबईतल्या 5 फेमस ठिकाणांबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
मरीन ड्राइव: पावसात मरीन ड्राइववरून समुद्राचा नजारा घेताना समुद्राची लाटं आणि थंड वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करते. ‘क्विन्स नेकलेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी संध्याकाळच्या सैरिचा अनुभव खास असतो.
advertisement
3/7
गेटवे ऑफ इंडिया: पावसाच्या सरींमध्ये गेटवेच्या पार्श्वभूमीवर उठणारे ढग, अरबी समुद्राची जोरदार लाटं आणि समोर दिसणारी ताज हॉटेलची इमारत यामुळे इथे वेगळीच मज्जा आहे.
advertisement
4/7
वांद्रे फोर्ट: वांद्रेच्या समुद्रकिनारी वसलेला हा ऐतिहासिक किल्ला पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. येथे समुद्राच्या लाटांसोबत किल्ल्याच्या भिंतींवर बसून निसर्गाचा आनंद घेता येतो.
advertisement
5/7
हिरानंदानी गार्डन्स, पवई: युरोपियन शैलीत बांधलेली इमारती, स्वच्छ रस्ते, आणि हिरवाई यामुळे पवईतला हा भाग पावसात आणखी खुलतो. फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
advertisement
6/7
संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली: पावसाळ्यात हा नॅशनल पार्क निळ्या-पाण्याच्या धबधब्यांनी आणि दाट जंगलाने सजतो. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण स्वर्गासारखं आहे.
advertisement
7/7
मुंबईत या 5 ठिकाणांशिवाय पर्यटकांना आकर्षित करणारी इतरही ठिकाणं आहेत. महानगरीतील ही ठिकाणं पावसात अजूनच खुलतात, समुद्राच्या लाटा अधिक जोरात धडकतात, झाडाझुडपं हिरव्यागार होतात आणि रस्त्यांवर भटकंती करणं अधिकच सुखद वाटतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Mumbai Tourism: मुंबईत हे नाही पाहिलं, तर पाहिलं काय? पावसाळी पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल