TRENDING:

Mumbai To Matheran: माथेरानला वीकेंड प्लॅन करताय? मुंबईवरुन पहिली लोकल किती वाजता? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय

Last Updated:
Mumbai To Matheran By Train : माथेरानला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय. मात्र तुम्हाला माहिती नाही मुंबईवरुन पहिली लोकल ट्रेन किती वाजता असते तर ही दिलेली माहिती एकदा नक्की पाहा.
advertisement
1/7
माथेरानला वीकेंड प्लॅन करताय? मुंबईवरुन पहिली लोकल किती वाजता?
मुंबई असो वा पुणे जर काही फिरण्याचा प्लान ठरतो तेव्हा आपसुकच पहिल पर्यटन ठिकाण आठवत ते म्हणजे माथेरान. जर तुम्हीही मुंबईला राहता किंवा मुंबईहून माथेरानला लोकलने जायचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी.
advertisement
2/7
मुंबईहून माथेरानला तुम्ही बायरोडने किंवा लोकल ट्रेनने प्रवास करू शकता. मात्र सकाळी लवकर निघायचं असल्यास पहिली लोकल ट्रेन किती वाजता सुटते आणि कोणत्या ट्रेनने तुम्ही माथेरानपर्यंत पोहोचू शकता मात्र याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
advertisement
3/7
माथेरानला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्याय निवडल्यास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते जी की, माथेरानसाठी थेट लोकल उपलब्ध नसल्याने कर्जत किंवा खोपोली मार्गावरील लोकलनेच प्रवास करावा लागतो. मात्र या लोकलने प्रवास करताना तुम्हाला नेरळ स्थानकावर उतरावे लागते.
advertisement
4/7
सीएसटी स्टेशनवरून प्रवास करणार असाल तर सकाळची पहिली लोकल ट्रेन 4:35 वाजता कसाऱ्यासाठी निघते. ही ट्रेन दादर स्थानकात 4.48 वाजता पोहोचते आणि थेट नेरळ येथे सकाळी 6:28 वाजेपर्यंत नेते. मात्र ही लोकल चुकली तर सीएसटीवरूनच 4:47 वाजताची कर्जत लोकल पकडता येईल जी तुम्हाला नेरळला सुमारे 6:51 वाजता पोहोचवते.
advertisement
5/7
जर तुम्हाला त्या दिवसाच रात्रीच परत निघायचं असेल तर नेरळवरून तुम्ही सीएसटीकडे जाण्यासाठी 10:19 वाजता जाणारी फास्ट लोकल पकडू शकता आणि त्यानंतर 10:57 वाजता जाणारी शेवटची स्लो लोकल आहे जी तुम्हाला मुंबईला 1:05 पर्यंत पोहोचवेल.
advertisement
6/7
शेवटचे म्हणजे माथेरानला जाण्यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनवरुन टॉय ट्रेन उपलब्ध आहे. मात्र ही ट्रेन उपलब्ध नसल्यास नेरळ स्टेशनबाहेरून शेअरिंग टॅक्सी मिळतात, ज्या तुम्हाला तिथं पर्यंत पोहचवेल.
advertisement
7/7
थंडीच्या दिवसात माथेरानमधील निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना विशेष भुरळ घालतात. दाट जंगल, हिरवीगार झाडे, धुक्याची चादर आणि थंड वारा यामुळे संपूर्ण परिसर मनमोहक दिसतो. यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Mumbai To Matheran: माथेरानला वीकेंड प्लॅन करताय? मुंबईवरुन पहिली लोकल किती वाजता? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल