TRENDING:

55 पिकांची शेती अन् ग्रामीण संस्कृतीचं दर्शन, पुण्याजवळचा आनंदमळा पाहिलात का?

Last Updated:
आनंदमळा येथे आमराई, शेतावरील प्राणी, फूड फॉरेस्ट, मसाला आणि औषधी वनस्पती अशी विविध आकर्षणे पाहायला मिळतात.
advertisement
1/9
55 पिकांची शेती अन् ग्रामीण संस्कृतीचं दर्शन, पुण्याजवळचा आनंदमळा पाहिलात का?
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निवांत ठिकाणी फिरायला जायला सर्वांनाच आवडतं. पण एका दिवसाच्या सुट्टीत मोठ्या शहरातून बाहेर जाणं अनेकांना शक्य होत नाही. कृषी पर्यटन हा त्यासाठी अनेकांना उत्तम पर्याय वाटतो.
advertisement
2/9
<a href="https://news18marathi.com/pune/">पुणेकरांनाही</a> अशा पर्यटनाचा आनंद घेता येत आहे. हिंजवडीजवळ दारुंब्रे येथे समीर वाघोले यांनी आनंदमळा नावानं कृषी पर्यटन केंद्र विकसित केलंय. या ठिकाणी ग्रामीण संस्कृतीचं अनुभव घेत जैवविविधता पाहण्याची संधी मिळते.
advertisement
3/9
हिंजवडीपासून जवळच दारुंब्रे हे गाव आहे. याठिकाणी समीर वाघोले यांनी 2016 मध्ये नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी शाश्वत शेतीचे मॉडेल तयार केले. त्याला व्यवसायाची जोड दिली. 2018 मध्ये येथे आनंदमळा हे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. याठिकाणी ग्रामीण संस्कृती आणि जैविविधता पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली, असे समीर वाघोले सांगतात.
advertisement
4/9
नैसर्गिक शेती, ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावाचा अनुभव देणारं वातावरण याठिकाणी पाहायला मिळतं. 10 एकरावरील विस्तीर्ण नैसर्गिक शेती, त्यासाठी आवश्यक असणारी जैवविविधता, फुलपाखरु उद्यान, बोटॅनिकल गार्डन, नैसर्गिक देवराई, खास लहान मुलांकरीत बनविलेली शेतीची लहान मॉडेल्स इथे पाहायला मिळतात. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणारी परिसंस्थाही इथे बघायला मिळते, असे वाघोले सांगतात.
advertisement
5/9
आनंदमळ्यात ऋतूनुसार भातलावणी महोत्सव, रानभाजी महोत्सव, हुरडा पार्टी, पतंग जत्रा, उन्हाळी शिबिरे असे विविध कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. आमराई, शेतावरील प्राणी, फूड फॉरेस्ट, मसाला आणि औषधी वनस्पती अशी विविध आकर्षणे इथे पाहायला मिळतात.
advertisement
6/9
लहान मुलांसाठी निसर्ग उपक्रम शाळा आहे. गुरुकुल आणि होम स्कुलिंग साठी असणार अभ्यास क्रम येथे आहे. ज्यामध्ये निसर्ग आणि शेती डोळ्यासमोर ठेऊन मुलांना शिकवलं जातं. त्यासाठी शेतीची अभ्यास शाळा असे उपक्रम वर्ष भर राबवले जातात.
advertisement
7/9
आनंदमळ्यात पूर्णपणे नैसर्गिक शेती केली जाते. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणारी परिसंस्था येथे तयार केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, मधमाश्यांना आवडणारी झूडपे, देशी वृक्ष याठिकाणी आहेत.
advertisement
8/9
त्याचप्रमाणे 55 प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. नैसर्गिक शेती म्हणजे काय हे या माध्यमातून सांगितलं जातं, असे वाघोले सांगतात.
advertisement
9/9
दरम्यान, ज्यांना शेतीची आवड आहे आणि निसर्गाचा एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी पुण्याजवळचं हे एक उत्तम पर्यटन केंद्र आहे. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
55 पिकांची शेती अन् ग्रामीण संस्कृतीचं दर्शन, पुण्याजवळचा आनंदमळा पाहिलात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल