TRENDING:

दिवाळीनिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, ‘या’ मार्गावर धावणार जादा बसेस

Last Updated:
दिवाळीच्या काळात बससेवेवर पडणारा ताण लक्ष्यात घेता बसने प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक खुशखबर दिली आहे.
advertisement
1/7
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, ‘या’ मार्गावर धावणार जादा बसेस
दिवाळीसारख्या सणाच्या निमित्याने बाहेरगावी जाणाऱ्याचा मोठा वर्ग असतो. याच काळात खाजगी वाहनांचे दर सामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याने या दिवसांमध्ये प्रवाश्यांचा सर्वाधिक ताण हा रेल्वे अथवा बस सेवेवर पडत असतो. त्यातल्या त्यात रेल्वे अथवा बसमध्ये सीट आरक्षित मिळणे म्हणजे मोठी कसरत आहे.
advertisement
2/7
दिवाळीच्या काळात बससेवेवर पडणारा ताण लक्ष्यात घेता बसने प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक खुशखबर दिली आहे.
advertisement
3/7
दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या अचानक वाढत्या किंमती ही प्रवाश्यांचा दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरत असते. यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाने नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/7
या दिवसात प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये, तसेच त्यांची लूट होऊ नये, या उद्देशाने या बसेस सुरू करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
advertisement
5/7
नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर 7 ते 11 नोव्हेंबर या काळात शिवशाही, आसनी व साधारण आसनी अश्या स्वरूपात नियमित फेऱ्यांशिवाय जादा फेऱ्या सोडण्यात येतील. तसेच 15 नोव्हेंबरपासून गणेशपेठ बसस्थानक येथून दुपारी 1, 3, 4 व सायंकाळी 6 वाजताच्या पुण्यासाठीच्या नियमित सेवांशिवाय सायंकाळी 5 व 7 वाजता बसेस सोडल्या जातील. प्रवासी वाढल्यास आणखी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, असे एसटी महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
advertisement
6/7
याशिवाय नागपूर-माहूर, सावनेर-माहूर, नागपूर-वाशीम, नागपूर-गोंदिया, सावनेर-गोंदिया, उमरेड-अमरावती, रामटेक-आर्णी, काटोल-पांढरकवडा या मार्गांवरही जादा बसेस धावणार आहेत.
advertisement
7/7
एसटीने प्रवास करु इच्छिणाऱ्यांनी अधिक आरक्षणा संदर्भात आणि अधिक माहितीसाठी एसटी महामंडळ आगारात विचारपूस करावी, अशी माहिती नागपूर विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
दिवाळीनिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, ‘या’ मार्गावर धावणार जादा बसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल