हाय गर्मी..! महाराष्ट्रातली थंड हवेची ठिकाणंच तापली, महाबळेश्वरचं तापमान पाहून फुटेल घाम!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Hill Station Temperature: राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून थंड हवेची ठिकाणे देखील तापली आहेत. महाबळेश्वर, माथेरानचं तापमान पाहूनच घाम फुटेल.
advertisement
1/7

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतात. परंतु, यंदा हा प्लॅन बदलावा लागणार आहे. कारण राज्यातील थंड हवेची ठिकाणं देखील उकाड्याने हैराण करताना दिसत आहेत. यंदा महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान अशा ठिकाणांचा पारा देखील चांगलाच चढला आहे.
advertisement
2/7
महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सची वाटचाल यंदा हीट स्टेशन्सकडे सुरू असल्याचं दिसतंय. एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात या ठिकाणचा पारा वाढला आहे. लोणवाळ्यात सोमवारी 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीये. तर इतपुरी, तोरणमाळ देखील उन्हाचा तडाखा जाणवतोय.
advertisement
3/7
उन्हाळ्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे पर्यटकांचं विशेष आवडतं ठिकाण असतं. पण, यंदा एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात महाबळेश्वर तापलं असून 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. तर पाचगणीचा पारा 34 अंशांवर आहे.
advertisement
4/7
कोकणातील आंबोलीचं (सिंधुदुर्ग) तापमान 35 अंशांवर गेलंय. तर रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये देखील 34.04 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. पुण्यातील लोणावळ्यात सर्वाधिक 38 अंशांवर पारा गेलाय.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ही ठिकाणे उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. इथलं तापमान अनुक्रमे 37 अंश आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलंय. तर नंदुरबारमधील तोरणमाळ येथे देखील 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. अमरावतीतील चिखलदरा 32 अंश सेल्सिअस आणि बुलढाण्यात 39 अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला आहे.
advertisement
6/7
राज्यात उष्णतेचा पारा चढला असतानाच थंड हवेची ठिकाणेही तापली आहेत. जागतिक तापमानवाढ व उष्ण वाऱ्यांमुळे कमाल तापमानात वाढ झालीये. तसेच जमिनीचे तापमान वाढत असल्याचा प्रभाव देखील जाणवतोय. प्रेक्षणीय ठिकाणांवर वाढलेली वाहतूक, काँक्रेटीकरण आणि बांधकामांत वाढ ही देखील तापमान वाढीची कारणे आहेत.
advertisement
7/7
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांवर सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत असणं अपेक्षित आहे. मात्र, उष्ण वारे, ग्रीन हाऊसचा परिणाम यामुळे वातावरणात बदल होत आहेत. त्याचा फटका तापमान वाढीच्या रुपात दिसत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
हाय गर्मी..! महाराष्ट्रातली थंड हवेची ठिकाणंच तापली, महाबळेश्वरचं तापमान पाहून फुटेल घाम!