TRENDING:

नवरा-बायकोची कमाल, कारला बनवलं अगदी घरासारखं, किचन अन् बेडही त्यातच, होतोय हा मोठा फायदा

Last Updated:
प्रत्येका दाम्पत्याच्या यशाचं रहस्य त्यांची एकता असते. आज अशाच एका दाम्पत्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. गुजरातच्या राजकोट येथील हे दाम्पत्य आहे. हे दाम्पत्य संपूर्ण सौराष्ट्रमध्ये ओळखले जाते. या दाम्पत्याने आपल्या कारलाच आपले घर बनवले आहे. या कारच्या माध्यमातून त्यांनी 8 राज्यांची यात्राही केली आहे. पण या कारची कहाणी काय आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. (मुस्तुफा लाकडावाला/राजकोट, प्रतिनिधी)
advertisement
1/6
नवरा-बायकोची कमाल, कारला बनवलं अगदी घरासारखं, किचन अन् बेडही त्यातच, होतोय हा..
नवीन पंड्या आणि काजल पंड्या यांची ही कहाणी आहे. ते 2018 मध्ये चारधामच्या यात्रेला गेले होते. यात्रेदरम्यान त्यांना राहण्यासाठी आणि जेवणाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेकदा तर त्यांना फक्त सलादच खावे लागले.
advertisement
2/6
आपला प्रवास पूर्ण केल्यावर आता यापुढे कुठेही फिरायला जाऊ तेव्हा आपली कार घेऊन जाऊ आणि या दरम्यान, कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कारमध्ये घरासारख्या सुविधा तयार करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/6
पंड्या दाम्पत्याच्या या विचारांना मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनीच नकार दिला. मात्र, तरीही ते हिम्मत हारले नाहीत. सोशल मीडियावर रिसर्च केल्यानंतर त्यांनी आपल्याच कारमध्ये घर तयार करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्यांना त्यांच्या पत्नीने खूप मोलाची साथ दिली.
advertisement
4/6
सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीवरुन, पंड्या दाम्पत्याने आपली एक कार मेकॅनिकजवळ घेऊन गेले. त्यानंतर त्याने एका महिन्यात या कारला एका घरासारखे तयार करुन दिले. या कारमध्ये सर्व सुविधा आहेत. यासाठी त्यांना फक्त 25 हजार रुपये खर्च आला.
advertisement
5/6
नवीनभाई यांच्या पत्नी काजलबेन यांनी सांगितले की, जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा एका खोलीचे भाडे 15 हजार रुपये द्यावे लागते. हे एका सामान्य माणसासाठी शक्य नसते. त्यामुळे आपल्या कारलाच आपले घरा बनवावे, असा विचार आमच्या मनात आला. हे कठीण होते. यासाठी इंटरनेटवर माहिती शोधली. शेवटी एक सेटअप मिळाला. यामध्ये वॉशरूम, किचन, गॅस-शेगडी, बेड, अंघोळीचा सर्व सामान येतो. या सर्व वस्तूंना कारमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवता येते.
advertisement
6/6
कार तयार केल्यानंतर पंड्या दाम्पत्याने 2023 मध्ये आपला पहिला प्रवास केला. इतकेच नव्हे तर त्यांनी गुज्जू कपल ट्रॅव्हलर नावाने एक चॅनेलही सुरू केले. आतापर्यंत या जोडप्याने आपल्या या घरासारख्या कारच्या माध्यमातून उत्तराखंड, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, काश्मिरसह 8 राज्यांची यात्रा केली आहे. नवीनभाई आणि काजल यांना आता संपूर्ण सौराष्ट्र ओळखायला लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
नवरा-बायकोची कमाल, कारला बनवलं अगदी घरासारखं, किचन अन् बेडही त्यातच, होतोय हा मोठा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल