ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर तिकिटाचे हे फायदे जाणून घ्या, महिलांसाठी महत्त्वाची बातमी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रत्येक दिवशी लाखो लोकं ट्रेनमध्ये प्रवास करतात. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्यांच्याजवळ असलेल्या तिकिटासोबत फक्त प्रवासच नव्हे तर इतर अनेक सुविधाही मिळतात. विशेष म्हणजे महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही तुमचे तिकिट दाखवून अनेक सुविधा घेऊ शकतात. (शिखा श्रेया/प्रतिनिधी)
advertisement
1/5

झारखंडची राजधानी रांची येथील रेल्वे मंडळाचे सीनियर डीसीएम निशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, तिकिटासह महिलांना काही सुविधाही मिळतात. पण याबाबत बहुतांश लोकांना माहिती नसते.
advertisement
2/5
सर्वात पहिली सुविधा म्हणजे जर तुमच्याजवळ तिकिट असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये स्पेशल प्रोटेक्शन मिळते. महिला जवान तुमचा सीट नंबर नोट करते आणि जेव्हा तुम्ही रात्री प्रवास करतात तेव्हा ते रात्री झोपताना ही तपासणी करण्यासाठी येतात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडत नाही.
advertisement
3/5
याशिवाय जर तुमची ट्रेन 4 ते 5 तास उशिरा आहे किंवा मग तुम्हाला 24 तासांसाठी कुठे थांबायचे आहे तर तुम्हाला स्टेशनमध्ये डोमेट्रीची सुविधा मिळेल. ही सुविधा तिकिट दाखवल्यावरच मिळते. महिलांसाठी वेगळी सुविधा असते. यासाठी 24 तासांसाठी 150 रुपये द्यावे लागतात.
advertisement
4/5
रांची रेल्वे स्टेशनमध्ये तुम्हाला ब्रेस्टफीडिंग एरिया सुद्धा मिळेल. हे नि:शुल्क आहे. तुम्हाला फक्त तिकिट दाखवायचे आहे आणि तिकिट दाखवल्यावर तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात.
advertisement
5/5
याशिवाय स्टेशनमध्ये महिला वेटिंग लाँज वेगळे असेल. हे पूर्ण एसी असेल. तिकिट दाखवल्यावरच तुम्हाला याठिकाणी प्रवेश मिळेल. यामध्ये तुम्हाला खाण्या-पिण्याचीही सुविधा मिळते. यासाठी तुम्हाला वेगळे शुल्क द्यावे लागते, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर तिकिटाचे हे फायदे जाणून घ्या, महिलांसाठी महत्त्वाची बातमी!