driving tips for women : महिलांनी गाडी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, महत्त्वाची माहिती...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
दिल्लीत किंवा इतरही ठिकाणी महिला रात्री उशिरा ऑफिस किंवा नोकरीवरून परततात तेव्हा काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यामुळे तुम्ही रस्त्यावरील अनेक अपघात टाळू शकता. याबाबत जाणून घेऊयात काही खास टिप्स. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/4

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि रात्री उशिरा स्कूटरने घरी एकट्या येत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही कोणत्याही मोठ्या अडचणीत येण्यापासून वाचू शकता.
advertisement
2/4
रस्ता सुरक्षा अभियान चालवणारे संतोष यांनी सांगितले की, महिलांनी नेहमी सावकाश गाडी चालवावी, हळू चालवणे आपल्यासाठी सुरक्षेचे असते. सावकाश गाडी चालवली तर अपघाताचा धोका टळतो. फक्त स्लो ड्रायव्हरच ड्रायव्हिंगचा खरा मास्टर असतो.
advertisement
3/4
ते पुढे म्हणाले की, काळ्या मिरचीचा स्प्रे आणि हॉकी आपल्यासोबत ठेवा. परिस्थिती नियंत्रणाबाहेर येण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आधीच तयार करणे हे तुमचे काम आहे. गाडी चालवताना ही शस्त्रे तुमच्या आवाक्यात असावीत, हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.
advertisement
4/4
संतोष पुढे म्हणाले की, हिल्स घालू नका. बहुतेक महिलांना हील्स घालण्याची खूप आवड असते. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करतानाही त्या हिल्स घालतात. अनेकवेळा वाटेत वाहनाचा तोल बिघडतो आणि मग स्वतःचा आणि वाहनाचा तोल सांभाळता येत नाही. म्हणून अनेकवेळा आपल्यासाठी मोठी समस्या बनते. त्यामुळे दुचाकी चालवताना हील्स घालू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
driving tips for women : महिलांनी गाडी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, महत्त्वाची माहिती...