Tourist Places In Amravati: विदर्भाचे नंदनवन, पावसाळ्यात निसर्ग अनुभवावा तर इथंच, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Tourist Places In Amravati: विदर्भाचे नंदनवन म्हणून मेळघाटची ओळख आहे. हे पावसाळ्यात अगदी स्वर्गासारखे फुलून जाते.
advertisement
1/7

विदर्भाचे नंदनवन म्हणून मेळघाटची ओळख आहे. त्याच मेळघाटमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पावसाळ्यात अगदी स्वर्गासारखे फुलून जाते. सातपुडा पर्वताच्या शिखरावरील हे ठिकाण बघण्यासाठी दूरदूरून पर्यटक याठिकाणी फिरायला येतात.
advertisement
2/7
चिखलदरा हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 1118 फूट इतक्या उंचीवर आहे. याठिकाणी बघण्यासाठी वेगवेगळे पॉइंट आहेत. अमरावतीपासून 80 किमी अंतरावर चिखलदरा हे पर्यटन स्थळ आहे. मेळघाटमधील तो घाटमाथ्याचा वळणदार रस्ता आपल्याला स्वर्गसुखाचा आनंद देऊन जातो.
advertisement
3/7
जसजसं आपण वर जातो तसतसं सौंदर्य आणखी वाढत जातं. त्या वळणदार रस्त्यावरच आपल्याला अनेक ठिकाणी छोटे झरे आणि सगळीकडे हिरवेगार वातावरण बघायला मिळते. चिखलदरा येथे सूर्यास्त पॉइंट, मंकी पॉइंट, मोजरी पॉइंट, मालवीय पॉइंट, प्रॉस्पेक्ट्स पॉइंट, पंचबोल पॉइंट आणि देवी पॉइंट असे सात पॉइंट आहेत. हे सर्व पॉइंट एकमेकांपासून काही अंतरावर आहेत.
advertisement
4/7
प्रत्येक पॉइंटची काही न काही विशेष बाब आहे. देवी पॉइंट येथील देवीचे मंदिर हे एका मोठ्या गोल घुमट असलेल्या दगडाच्या खाली आहे. त्या दगडातून सतत पाणी वाहत असतं. त्याठिकाणी दर्शनासाठी अनेक भक्त येतात. त्याचबरोबर पंचबोल पॉइंट येथे आपण दिलेला आवाज आपल्याला परत परत ऐकायला येतो. तसेच इतरही पॉइंटचे काही वैशिष्ट्ये आहेत.
advertisement
5/7
चिखलदरा येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे उंच टेकडीवरून खोल दरीत कोसळणारे धबधबे. पावसाळ्यात हे धबधबे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. देवी पॉइंट च्या बाजूला सुद्धा एक सुंदर धबधबा असलेला बघायला मिळतो. त्याठिकाणी पर्यटक जाऊन फोटोशूट करतात. फोटो शूट साठी देखील हे ठिकाण अतिशय उत्तम आहे.
advertisement
6/7
निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतल्यानंतर जर तुम्हाला झोपाळा, ब्रेक डान्स, ड्रॅगन झूला, घोडसवारी, सायकल स्वारी त्याचबरोबर छोट्या छोट्या कार मधून सवारी करायची असल्यास त्याचीही सुविधा त्याठिकाणी आहे. भीमकुंड येथे स्काय सायकलिंग सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता.
advertisement
7/7
सर्व चिखलदरा फिरत असताना भूक तर लागणारच ना? त्यासाठी तेथील प्रसिद्ध मॅगी, भाजून छान लिंबू आणि मीठ लावलेले मक्याचे कणीस, कच्चा चिवडा त्याठिकाणी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर जेवण करायचे असल्यास हॉटेल सुद्धा त्याठिकाणी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Tourist Places In Amravati: विदर्भाचे नंदनवन, पावसाळ्यात निसर्ग अनुभवावा तर इथंच, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी, PHOTOS