फक्त 99 रुपयांत विमानप्रवास, तुमचं विमानात बसण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार, वाचा संपूर्ण माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेकांचे विमान प्रवासाचे स्वप्न असते. मात्र, तिकीट दर जास्त असल्याने लाखो नव्हे तर कोट्यवधी भारतीयांना विमानप्रवास करता येत नाही. मात्र, आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अगदी कमी पैशात म्हणजे तुम्हालाही विश्वास बसणार नाही, इतक्या पैशात आता विमानप्रवास करता येणार आहे. किती रुपयांत विमान प्रवास करता येणार ते जाणून घेऊयात. (वसीम अहमद/अलीगढ, प्रतिनिधी)
advertisement
1/5

आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते पण फक्त 99 रुपयांमध्ये. हो हे खरंय. देश पहिल्यांत फक्त 99 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे.
advertisement
2/5
केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत (उडे देश का हर आम नागरिक) उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने बीडीके ग्रुप आणि फ्लाइंग बिग यांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. यामुळे विमान प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळेल.
advertisement
3/5
एप्रिल महिन्यात अलीगढ ते लखनऊ पर्यंत हा विमान प्रवास करता येणार आहे. मात्र, ही सुविधा फक्त गरीब लोकांसाठी आहे. या अंतर्गत अशा प्रवाशांसाठी प्रत्येकी पाच जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातील.
advertisement
4/5
बीडीके ग्रुपचे एमडी विशाल गर्ग यांनी माहिती देताना सांगितले की, फ्लाइंग बिग एअरलाइन्सने एक मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये देशात प्रथमच केवळ मूळ भाडे 99 रुपयांसह 354 रुपये फी देऊन, पाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना 19 आसनी विमानात अलिगढ ते लखनऊ प्रवास करता येणार आहे.
advertisement
5/5
ही देशातील पहिली संधी असेल जी फक्त 99 रुपयांमध्ये लोकांना विमानात बसून प्रवास करता येणार आहे. यामुळे जे लोकांचे विमानप्रवासाचे स्वप्न पैशांअभावी अपूर्ण राहत होते, ते त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
फक्त 99 रुपयांत विमानप्रवास, तुमचं विमानात बसण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार, वाचा संपूर्ण माहिती..