Stress vs Anxiety : तणाव आणि चिंता, दोन्हींमध्ये फरक काय? जाणून घ्या, तरच करता येईल उपाय..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Difference Between Stress And Anxiety : हल्ली लोकांच्या डोक्याला खूप ताण असतो. बदलती जीवनशैली आणि स्पर्धेच्या युगात कायम मानसिकरीत्या स्थिर आणि शांत राहणं सर्वांचं जमतं असं नाही. त्यातून मग अनेकांना वेगवेगळे त्रास होतात. मानसिक त्रासांबद्दल विषय निघाला की, ताण, तणाव, चिंता, नैराश्य.. असे अनेक शब्द समोर येतात आणि ते महत्वाचे असतात. पण बऱ्याचदा या सर्वांना आपण एकच त्रास मानतो. पण असे नसते. चला पाहूया यांच्या नेमका फरक काय आहे.
advertisement
1/8

बदलत्या जगात सतत धावपळ, वाढत्या जबाबदाऱ्या, खराब जीवनशैली, तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करणे यासारख्या गोष्टींमुळे मानसिक समस्या वाढल्या आहेत. या मानसिक समस्यांपैकी एक म्हणजे ताणतणाव वाढणे आणि दुसरी सतत चिंता वाटणे. चला तर मग जाणून घेऊया दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे.
advertisement
2/8
तणाव (Stress) आणि चिंता (Anxiety) हे दोन्ही शब्द सारखे वाटत असले तरी त्यांच्यात खूप फरक असतो. आपण या दोन्हींच्या लक्षणांकडे नीट लक्ष दिल्यास आपण फरक सहजपणे ओळखू शकता आणि आपल्या मानसिक समस्यांवर अधिक चांगल्या प्रकारे मात करण्याचा प्रयत्न करू शकतो.
advertisement
3/8
तणावाची लक्षणे : हेल्थलाइननुसार, चक्कर येणे, स्नायूंचा ताण, मळमळ आणि जुलाब यांसारख्या पचन समस्या, निद्रानाश, राग किंवा चिडचिड, डोकेदुखी, घाम येणे, अस्वस्थता, भूक न लागणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.
advertisement
4/8
चिंतेची लक्षणे : चिंतेमध्ये तणावासारखी लक्षणे देखील असतात. परंतु, अशी लक्षणे दीर्घकाळ टिकतात. याशिवाय सतत काहीतरी गडबड होण्याची भीती, हात-पाय बधीर झाल्यासारखे वाटणे, मेंदूतील धुके (Brain Fog) ही लक्षणे दिसतात.
advertisement
5/8
चिंता आणि तणावातील फरक : दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे ट्रिगरची उपस्थिती. उदाहरणार्थ, जेव्हा तुमची मुलं घरी येतात आणि तुम्हाला त्रास देऊ लागतात, तेव्हा तुम्ही तणावाचा सामना करता. परंतु चिंतेचे प्रत्येक वेळी कारण असते, म्हणजे ट्रिगर करणारी गोष्ट असतेच असे नाही.
advertisement
6/8
चिंता आणि तणावाचे कारण : जेव्हा आपण शारीरिक मानसिक दडपण अनुभवतो तेव्हा आपल्याला तणाव जाणवतो. हा ताण सामान्यतः जीवनात मोठे बदल होण्यापूर्वी जाणवतो. जसे की, लग्न, मुलाचा जन्म, नवीन ठिकाणी जाणे, नवीन नोकरी, कुटुंबातील कोणाचा मृत्यू इ.
advertisement
7/8
अशाप्रकारे, तणाव आणि चिंता सारख्याच वाटतात. परंतु दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जर तुम्ही याकडे व्यवस्थित लक्ष दिले आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही मानसिक समस्या अधिक चांगल्या प्रकारे दूर करू शकता.
advertisement
8/8
Disclaimer: (या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सदरील बातमीतील मतांशी न्यूज18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Stress vs Anxiety : तणाव आणि चिंता, दोन्हींमध्ये फरक काय? जाणून घ्या, तरच करता येईल उपाय..