TRENDING:

Summer Tips : उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालावे? उष्णतेपासून वाचवतील 'या' टिप्स

Last Updated:
Which color cloths are good to wear in summer : आता मार्चमध्येच खूप ऊन जाणवत आहे. अजून उन्हाळ्याचे खरे दिवस सुरूच व्हायचेय. मात्र आत्ताच उष्णतेने हैराण केलंय. म्हणूनच उन्हाळ्यात तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कपडे घालायला हवे, किंबहुना कोणकोणत्या रंगाचे कपडे घालायला हवे हे समजून घेऊया.
advertisement
1/5
उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालावे? उष्णतेपासून वाचवतील 'या' टिप्स
उन्हाळ्यात काही विशिष्ठ रंगांचे कपडे आपल्याला तीव्र उष्णतेपासून वाचवतात. तसेच काही प्रकारचे कपडेही आपल्याला उन्हाचा त्रास होऊ देत नाहीत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
advertisement
2/5
उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी तुम्ही पांढरे, हलके निळे, गुलाबी आणि पिवळे असे हलक्या रंगाचे कपडे घालावेत. हे रंग उन्हाची तीव्रता तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू देत नाहीत.
advertisement
3/5
या रंगांचे कपडे सूर्यकिरणांना परावर्तित करतात. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आणि तुमच्या त्वचेचेही नुकसान होत नाही. म्हणूनच काही लोक पांढऱ्या सनकोटचाही वापर करतात.
advertisement
4/5
उन्हाळ्यात तुम्ही कॉटनचे अंतर्वस्त्र म्हणजेच अंडरवेअर किंवा बनियान वापरावे. त्याचाप्रमाणे खादी, रेयॉन आणि मोडलसारखे कापड तुम्ही घालू शकता, जे ओलावा शोषून घेतात. हे कपडे शरीरातून हवा बाहेर पडू देतात आणि शरीर थंड ठेवतात.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालावे? उष्णतेपासून वाचवतील 'या' टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल