Jaggery Benefits : 4 प्रकारचा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर, शरीरातील आयरन आणि रक्ताची कमतरता होईल दूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
गुळामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. याच्या सेवनाने आयरनची कमतरता भरून निघते. तसेच यात कॅल्शियम, मॅग्निशियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी असते. शरीरातील हीमोग्लोबिन प्रमाणात ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करणे हेल्दी मानले जाते. पण तुम्हाला माहितीये का की गुळ केवळ उसाच्या रसापासून नाही तर खजुराच्या रसाने सुद्धा तयार केला जातो. तेव्हा कोण कोणत्या पदार्थांपासून गुळ तयार केला जातो याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

उसाच्या रसापासून तयार झालेला गूळ : उसाच्या रसापासून तयार झालेला गूळ हा खूप कॉमन असून ती प्रत्येक मार्केटमध्ये उपलब्ध असतो. उसाच्या रसाला उकळून त्यापासून गूळ तयार केला जातो. बाजारात तुम्हाला गुळाची ढेप, पावडर आणि ग्रॅन्यूल्स मिळतात. याचा रंग डार्क ब्राऊन असतो. उसाची क्वालिटी आणि प्रोसेसिंगवर गुळाचा रंग अवलंबून असतो. या गुळात अनेक पोषकतत्व असतात ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते. हाडं मजबूत होतात आणि शरीरातील एलेक्ट्रोलाइट बॅलेन्स आणि मेंटेन राहतात.
advertisement
2/5
खजूरचं गुळ : खजूरपासून सुद्धा गुळ बनवला जातो. खजूर पासून तयार केला जाणारा गुळ हा खूप स्वादिष्ट असतो. याचा फ्लेवर खूप छान असतो तसेच यातून चांगला सुगंध सुद्धा येतो. तसेच खजूर गुळात नॅचरल शुगर, मिनिरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषकतत्व असतात.
advertisement
3/5
कोकोनट पाम गुळ : कोकोनट पाम गुळ हा नारळातून येणाऱ्या रसापासून बनवले जाते. खास मिठाई बनवण्यासाठी या गुळाचा वापर केला जातो. यात सुद्धा व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी घटक असतात. हा एनर्जीचा नैसर्गिक स्रोत असून हे शरीरात एलेक्ट्रोलाइट्स नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
4/5
पामिरा गुळ : पामिरा गुळ हा पामिरा पामच्या रसाने तयार केला जातो. हा गुळ अधिकतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मिळतो. याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याची चव खूप स्वादिष्ट असते. याचा वापर गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यात भरपूर प्रमाणात मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम आणि आयरनचे प्रमाण भरपूर असते. डायबिटीजच्या रुग्णांना ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
5/5
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jaggery Benefits : 4 प्रकारचा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर, शरीरातील आयरन आणि रक्ताची कमतरता होईल दूर