दूध आणि फळं एकत्र खाताय? थांबा! आयुर्वेदानुसार शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आयुर्वेदात अन्न सेवनाचे विशिष्ट नियम दिले आहेत. दूध आणि फळं एकत्र घेतल्यास पचन बिघडते आणि त्वचारोग होऊ शकतात. तूप आणि मध समान प्रमाणात घेतल्यास विषारी...
advertisement
1/6

आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूनुसार आहारात काय बदल करावेत हे सांगितलं आहे. आयुर्वेद ही भारताची प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे, जी आपल्याला काय खावं हे तर शिकवतेच, पण कोणत्या गोष्टीसोबत काय खाऊ नये हे देखील सांगते. आयुर्वेदानुसार, काही अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यास पचन बिघडतं आणि शरीरात विषारी घटक तयार होतात. हे पदार्थ जास्त काळ एकत्र खाल्ल्यास शरीराचं संतुलन बिघडून अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे याबद्दल प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
2/6
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, आयुर्वेदानुसार दूध आणि फळांचं मिश्रण आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. आजकाल दूध आणि फळांपासून बनवल्या जाणाऱ्या स्मूदीचा ट्रेंड वाढला आहे, पण आयुर्वेद दूध आणि फळं एकत्र घेण्यास मनाई करतं. यामागचं कारण असं आहे की, दूध थंड आणि पचायला जड असतं, तर फळं गोड आणि आंबट असू शकतात. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या जातात, तेव्हा आपली पचनशक्ती मंदावते, ज्यामुळे गॅस, अपचन, कफ वाढणे आणि विषारी घटक तयार होणे अशा समस्या येऊ शकतात. या कॉम्बिनेशनमुळे त्वचेचे आजार आणि श्वसनाचे त्रासही होऊ शकतात.
advertisement
3/6
मध गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत खाणंही चांगलं मानलं जात नाही. मध, गरम पाणी आणि दूध हे तिन्ही पदार्थ स्वतःमध्ये फायदेशीर आहेत, पण आयुर्वेदानुसार मध गरम पाणी किंवा गरम दुधात मिसळून घेतल्यास त्याचे विषारी परिणाम होऊ शकतात. याचं कारण म्हणजे, जेव्हा मध गरम केलं जातं किंवा गरम वस्तूंमध्ये मिसळलं जातं, तेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टीने ते विषासारखं बनतं. त्यामुळे मध कधीही शिजवू नये किंवा गरम पदार्थांमध्ये मिसळू नये.
advertisement
4/6
तूप आणि मध या दोन्हीमध्ये आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्म भरपूर आहेत. पण हे दोन्ही सम प्रमाणात, म्हणजे सारख्या प्रमाणात, एकत्र करून खाण्यास मनाई आहे. याचं कारण असं की, मध उष्ण (गरम) गुणांचं आहे आणि तूप शीत (थंड) गुणांचं आहे. या दोघांचं मिश्रण जर संतुलित नसेल, तर ते शरीरात विषारी घटक तयार करतं. याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. मात्र, जर तूप आणि मध विषम प्रमाणात घेतले, म्हणजे एक जास्त आणि एक कमी, तर ते हानिकारक नसतं आणि अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये याच पद्धतीने त्यांचा वापर केला जातो.
advertisement
5/6
दूध चिकन किंवा माशांसोबत पिऊ नये. दूध थंड असतं आणि चिकन किंवा मासे उष्ण स्वभावाचे असतात. त्यांच्यातील या तापमानातील फरकामुळे पचनसंस्थेमध्ये गोंधळ निर्माण होतो, ज्यामुळे विषारी घटक तयार होतात. यामुळे शरीरातील विषारीपणा वाढू शकतो. ज्यामुळे एक्जिमा, फंगल इन्फेक्शन किंवा सोरायसिससारख्या त्वचेच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे, चिकन किंवा मासे खाल्ल्यानंतर काही तासांनीच दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेद देतो.
advertisement
6/6
फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक मानले जाते. आयुर्वेदानुसार, फळं खाण्याची योग्य वेळ सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा नंतर आहे. याचं कारण असं की, फळं लवकर पचतात, तर धान्य, प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या इतर गोष्टी पचायला जास्त वेळ लागतो. जर फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले किंवा दुसरे अन्न खाल्ले, तर पोटात फळांचं किण्वन (fermentation) सुरू होतं, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन अशा समस्या येऊ शकतात. याचा केवळ पचनावरच नाही, तर पोषक तत्वांच्या शोषणावरही परिणाम होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
दूध आणि फळं एकत्र खाताय? थांबा! आयुर्वेदानुसार शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम