डोदा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण
हार्दिक आणि इरफान यांच्यातील वादाचं प्रमुख कारण म्हणजे बडोदा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण... बडोदा क्रिकेटवर कुणाचं वर्चस्व? असा सवाल गेल्या अनेक वर्षापासून विचारला जातो. इरफान पठाण टोळीने अनेकवेळा बडोदा क्रिकेटवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर आता पांड्याने देखील आपली फिल्डिंग टाईट केली आहे. कुणाच्या मदतीने हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये स्नेहभाव पहायला मिळाला.
advertisement
एकमेकांची गळाभेट घेतली
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका नाचत मैदानातून जात होते. त्यावेळी इरफान पठाण समालोचन करत होता. अशातच हार्दिक आणि इरफान यांनी एकमेकांना पाहिलं. दोन्ही खेळाडूंनी यावेळी पुढाकार घेतला अन् एकमेकांची गळाभेट घेतली. इरफानने यावेळी महिकाची देखील भेट घेतली. दोघांमध्ये काहीतरी संवाद देखील झाला. यावेळी इरफानच्या तोंडावरचा रंग उडाल्याचं दिसलं तर हार्दिक देखील हलक्या स्माईलमध्ये बघत होता.
हार्दिक इरफान यांच्यातील वाद काय?
दरम्यान, मागील आयपीएलमध्ये देखील हार्दिक आणि इरफान पठाण यांच्यात वाद निर्माण झाला होता. हार्दिक पांड्यावर टीका केल्याने इरफाण पठाण याला कॉमेन्ट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर इरफाणने आपल्या युट्यूब चॅनेलमधून पांड्यावर नाव न घेता जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच पेटला होता. अशातच आता दोघांमधील वाद मिटला की काय? असा सवाल विचारला जात आहे.
