Bhakari : भाकरीला पाणी का लावतात, नाही लावलं तर काय होईल?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Water On Bhakari : भाकरीला वर पाणी लावणं ही केवळ सवय नाही, तर पिढ्यान्पिढ्या चालत आलेली एक शास्त्रीय पद्धत आहे. ही कृती पाहायला साधी वाटली तरी त्यामागे अनुभव, विज्ञान आणि आरोग्याशी संबंधित कारणं दडलेली आहेत.
advertisement
1/7

भाकरी... आता ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिली नाही. आता शहरातील लोकही भाकरी आवडीने खातात. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशा वेगवेगळ्या धान्यांची भाकरी बनवतात. काही लोक लाटून तर काही लोक हाताने थापून भाकरी बनवतात. भाकरी बनवताना एक गोष्ट सामान्य आहे ते म्हणजे भाकरी तव्यावर शेकायला टाकली की त्यावर पाणी लावणं.
advertisement
2/7
भाकरी थेट तव्यावर किंवा शेगडीवर भाजली जाते. उष्णतेमुळे तिच्या पृष्ठभागावरचा ओलावा पटकन उडून जातो. वर पाणी लावल्यामुळे भाकरीत ओलावा टिकून राहतो. भाकरी कोरडी किंवा कडक होत नाही, जास्त वेळ मऊ राहते विशेषतः ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं, कारण या धान्यांत ग्लूटेन नसतं.
advertisement
3/7
पाणी न लावता भाकरी भाजली तर वरचा थर पटकन जळतो किंवा काळा पडतो. पाणी लावल्याने उष्णतेचा थेट मारा कमी होतो. भाकरी समान तापमानात भाजली जाते, जळण्याची शक्यता कमी होते, ही प्रक्रिया हीट रेग्युलेशन म्हणून ओळखली जाते.
advertisement
4/7
पाणी लावल्यावर भाकरीच्या वरच्या थरात वाफ तयार होते. ही वाफ आत अडकून भाकरी फुगायला मदत करते आणि भाकरी आतून चांगली शिजते, कची राहत नाही. म्हणजे भाकरी भाजण्याबरोबरच थोडी वाफेवरही शिजते.
advertisement
5/7
पाणी न लावलेली भाकरी अनेकदा तुटक, कडक आणि कोरडी लागते. पाणी लावलेली भाकरी बाहेरून थोडी खरपूस आतून मऊ आणि लवचिक, चावायला सोपी आणि चवदार असते.
advertisement
6/7
अतिजास्त उष्णतेमुळे धान्यातील काही पोषक घटक नष्ट होऊ शकतात. पाणी लावल्यामुळे भाकरी मध्यम तापमानात भाजली जाते आणि पोषणमूल्य टिकून राहण्यास मदत होते
advertisement
7/7
पाणी नाही लावलं तर भाकरी पटकन कडक आणि कोरडी होते, वरचा भाग जळतो किंवा काळवंडतो, भाकरी नीट फुगत नाही, थोड्याच वेळात खाण्यायोग्य राहत नाही, पचायला जड वाटू शकते