Women Health : गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर खरंच सुरक्षित आहे का? तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Is use of contraceptive pills really safe : गर्भनिराधक गोळ्यांचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच महिला बिनधास्त या गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्या नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी प्रभावी असतात. पण याचा वापर आपल्या शारीसाठी खरंच सुरक्षित असतो का? चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून..
advertisement
1/7

काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या मॉर्निंग आफ्टर पिल्स म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात. प्रेग्नन्सी नको असलेल्यास संभोगानंतर महिला या पिल्स घेतात. परंतु या गोळ्यांचा गर्भाव्यतिरिक्त आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्या कितपत सुरक्षित आहेत, चला पाहूया.
advertisement
2/7
डॉक्टरांनी माहिती दिली आहे की, आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा वारंवार वापर महिलांच्या हार्मोनल संतुलन आणि मासिक पाळीत व्यत्यय आणू शकतो. कारण हे औषध केवळ अनपेक्षित परिस्थितींसाठी असते आणि ते गर्भनिरोधकाची नियमित पद्धत म्हणून अजिबात वापरू नये.
advertisement
3/7
स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले की, ही गोळी गर्भनिरोधक फेल झाल्यास किंवा असुरक्षित संभोग यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी असते. पण जेव्हा महिला त्याचा वापर कमी वेळेत वारंवार करतात, तेव्हा ते घटक ठरू शकते.
advertisement
4/7
एम्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. अपर्णा शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडीआयला माहिती देताना सांगितले की, 'अनियोजित परिस्थितीत आपत्कालीन गर्भनिरोधक हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. पण जेव्हा ते नियमितपणे वापरले जाते तेव्हा ते समस्या निर्माण होतात.'
advertisement
5/7
त्यांनी पुढे सांगितले, 'नियमित गर्भनिरोधकाच्या तुलनेत या गोळ्या कमी प्रभावी असतात. म्हणून फक्त आपत्कालीन गोळ्यांवरच विश्वास ठेवला तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते.'
advertisement
6/7
डॉक्टरांनी पुढे सांगितले की, 'यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे मासिक पाळीमध्ये व्यत्यय. या गोळ्या वारंवार वापरल्याने मासिक पाळी उशिरा येऊ शकते, रक्तस्राव जास्त होऊ शकतो किंवा मासिक पाळीच्या सायकलमध्ये स्पॉटिंग होऊ शकते.'
advertisement
7/7
तज्ञांनी पुढे सांगितले की, 'महिन्यातून किती आपत्कालीन गोळ्या घेता येतील यावर वैद्यकीयदृष्ट्या निश्चित मर्यादा नाही. मात्र डॉक्टर हेही सांगतात की, जर वारंवार या गोळ्या घ्याव्या लागत असतील तर तुम्हाला निश्चितच एका चांगल्या आणि प्रभावी गर्भनिरोधक पद्धतीची आवश्यकता आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women Health : गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर खरंच सुरक्षित आहे का? तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती..