13 मार्चला शनी होणार अस्त, साडेसातीचा त्रास सहन करत असलेल्यांनी 36 दिवस चुकूनही करू नका 'हे' काम!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानला जाणारा शनी लवकरच अस्त होणार आहे. 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी शनी मीन राशीत मावळणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानला जाणारा शनी लवकरच अस्त होणार आहे. 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी शनी मीन राशीत मावळणार आहे. सूर्य आणि शनी जेव्हा जवळ येतात, तेव्हा शनी आपली शक्ती गमावतो आणि तो 'अस्त' होतो. शनी या अवस्थेत साधारणपणे 36 दिवस राहणार असून, 18 एप्रिल 2026 रोजी तो पुन्हा उदय होईल. ज्या राशींवर सध्या शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरू आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. या 36 दिवसांच्या काळात काही चुका करणे तुम्हाला महागात पडू शकते.
advertisement
2/7
नवे धाडसी निर्णय टाळा: शनी अस्त असताना ग्रहाची शक्ती कमी होते, अशा वेळी घेतलेले व्यावसायिक निर्णय किंवा मोठ्या गुंतवणुकीत फसवणूक होण्याची शक्यता असते. 18 एप्रिलपर्यंत कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी आर्थिक रिस्क घेणे टाळावे.
advertisement
3/7
वादांपासून दूर राहा: शनी हा शिस्तीचा ग्रह आहे. या काळात तुमचा संयम सुटू शकतो. विशेषतः कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा घरामध्ये जोडीदाराशी वाद घालू नका. तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे वर्षानुवर्षांचे संबंध बिघडू शकतात.
advertisement
4/7
कायदेशीर कामात घाई नको: जर तुमचे एखादे कोर्टाचे काम किंवा जमिनीचा व्यवहार सुरू असेल, तर या काळात कागदपत्रांची नीट शहानिशा केल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. शनी अस्त असताना शत्रू पक्ष वरचढ होण्याची शक्यता असते.
advertisement
5/7
वाहन चालवताना सावधगिरी: शनी अस्ताचा प्रभाव अपघातांच्या शक्यतेवर होऊ शकतो. साडेसाती सुरू असलेल्या मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी रात्रीचा प्रवास टाळावा आणि वाहन अत्यंत वेगाने चालवू नये.
advertisement
6/7
अनथक परिश्रमात खंड नको: शनी अस्त झाला म्हणजे त्याची नजर नाही, असा विचार करू नका. शनी हा कर्माचा हिशोब ठेवतो. या काळात कामात आळस केल्यास किंवा शॉर्टकट वापरल्यास, शनी उदय झाल्यावर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
advertisement
7/7
तामसिक अन्नाचा त्याग: या काळात शरीर आणि मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणत्याही व्यसनांपासून दूर राहावे. शनीच्या अशुभापासून वाचण्यासाठी सात्त्विक आहार घेणे आणि शक्य असल्यास शनिवारी उपवास करणे फायदेशीर ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
13 मार्चला शनी होणार अस्त, साडेसातीचा त्रास सहन करत असलेल्यांनी 36 दिवस चुकूनही करू नका 'हे' काम!