IND vs NZ Final : राडा फिक्स! 'मनं तुटली तरी फरक पडत नाही' म्हणाऱ्या न्यूझीलंडच्या कॅप्टनला सूर्याचं भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये चोख प्रत्युत्तर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav On Mitchell Santner statement : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनर यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनर यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली.
advertisement
2/7
न्यूझीलंड गेल्या काही टूर्नामेंट्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. पण हायस्कोरिंग मॅचमध्ये जसप्रीत बुमराह हा भारतासाठी 'गेमचेंजर' ठरू शकतो, असं मत न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर याने व्यक्त केलं आहे. त्यावेळी तो बरळला.
advertisement
3/7
फायनलमध्ये मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो भारतीय चाहत्यांना शांत करणं हं आमचे मुख्य ध्येय असेल. , असं वक्तव्य सँटनरने केलं होतं.
advertisement
4/7
त्याला आता टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने चोख प्रत्युत्तर दिलंय. मॅचआधी घेतेल्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये सूर्यकुमार यादवने सँटनरच्या स्टेटमेंटची दोन वाक्यात हवा काढली.
advertisement
5/7
प्रत्येकजण हीच एक लाईन वापरत आहे. आम्हाला काहीतरी नवीन सांगा, असं म्हणत सूर्याने सँटनरच्या स्टेटमेंटला बगल दिली. त्यावेळी त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक केलं.
advertisement
6/7
प्रेस कॉन्फरेन्समध्ये न्यूझीलंडच्या पत्रकाराने सूर्याला 2023 च्या वर्ल्ड कपवरून पिन मारली. त्यावेळी त्याने थेट उत्तर दिलं. होगया साहब... तीन वर्ष झाली त्याला... आता 2026 सुरू आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान, मिचेल सँटनर आणि सुर्यकुमार यादव या दोघांच्या पत्रकार परिषदेत विश्वास दिसत होता. त्यामुळे आजचा सामना अतितटीचा होणार यात कोणतीही शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : राडा फिक्स! 'मनं तुटली तरी फरक पडत नाही' म्हणाऱ्या न्यूझीलंडच्या कॅप्टनला सूर्याचं भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये चोख प्रत्युत्तर