TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : आता शिक्षा मिळणार! विशाल-अनुश्रीने असं केलं तरी काय? रितेश Punishment देणार

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत भाऊच्या धक्क्यावर रितेश अनुश्री आणि विशालला शिक्षा देताना दिसतो आहे.
advertisement
1/7
आता शिक्षा मिळणार! विशाल-अनुश्रीने असं केलं तरी काय? रितेश Punishment देणार
बिग बॉस मराठी 6 च्या घरात रुचिता जामदार घरातून बाहेर गेली आहे. आता घरात नेमकं काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात विशाल आणि अनुश्रीला रितेश शिक्षा देतो आहे. असं या दोघांनी केलं तरी काय?
advertisement
2/7
प्रोमोत तुम्ही पाहू शकता घरातील इतर सदस्यांना वाइल्ड कार्ड सदस्यांवर हिट-फ्लॉपचा शिक्का लावायचा आहे. घरातील दोन दोन सदस्यांना बोलावलं जातं. त्यांना वाइल्ड कार्ड सदस्यांवर हिट-फ्लॉप चा शिक्का लावायला सांगितलं जातं.
advertisement
3/7
अनुश्री आणि विशाल सोबत आहेत. अनुश्री म्हणते तिच्या मते, संस्कृती हिट आहे तर विशाल बोलतो संकेत हिट आहे. हिट कोण यावरून अनुश्री आणि विशाल त्यांच्यामध्ये मतभेद होतात.
advertisement
4/7
यानंतर रितेश बोलतो, "लवकर निर्णय घ्या. निर्णय नाही घेतलात तर शिक्षा तुम्हाला मिळू शकते" विशाल थेट "नाही होत आहे सर", असं रितेशला सांगतो.
advertisement
5/7
नंतर विशाल आणि अनुश्री एकत्र बसलेले दिसतात आणि रितेश बोलतो "तुम्ही निर्णय नाही घेतला आणि आता त्या शिक्षेची वेळ आहे"
advertisement
6/7
यानंतर विशाल आणि अनुश्रीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतो. तसंच घरातील इतर सदस्यांना धक्का बसलेला दिसून येतो.
advertisement
7/7
आता खरंच अनुश्री आणि विशाल यांना शिक्षा मिळणार का? त्याचं नेमकं कारण प्रोमोत दाखवलं तेच आहे का? आणि हो तर नेमकी काय शिक्षा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आता शिक्षा मिळणार! विशाल-अनुश्रीने असं केलं तरी काय? रितेश Punishment देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल