Konkan Ro-Ro Ferry : मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो'नंतर मोठा निर्णय! मिळणार दोन नवे थांबे; जाणून घ्या सविस्तर
Last Updated:
Mumbai-Vijaydurg RoRo : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असून दोन नव्या जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
advertisement
1/7

मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या रो-रो जलवाहतूक सेवेला गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
2/7
मुंबई ते विजयदुर्ग या सेवेच्या मार्गावर आणखी दोन थांबे सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाने वेगाने काम सुरू केले आहे.
advertisement
3/7
जयगड आणि वेंगुर्ला येथे जेट्टी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी रो-रो सेवेचे थांबे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
advertisement
4/7
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर कोकणातील नागरिकांकडून मार्गावरील इतर ठिकाणीही थांबे सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार जयगड आणि वेंगुर्ला येथे सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
advertisement
5/7
जयगड परिसरात औद्योगिक विकास आणि बंदराच्या दृष्टीने हा थांबा महत्त्वाचा मानला जात आहे. तर वेंगुर्ला येथे थांबा सुरू झाल्यास मालवण, तारकर्ली आणि आचरा यांसारख्या पर्यटनस्थळांना जलमार्गे सहज पोहोचता येणार आहे.
advertisement
6/7
या रो-रो सेवेचे तिकीट दर कमी करण्याची मागणी देखील काही प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या जेट्टींची तांत्रिक कामे जवळपास पूर्ण झाली असून आवश्यक सुरक्षा तपासणी आणि परवानग्या मिळाल्यानंतर नियमित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
advertisement
7/7
या जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि कोकण किनारपट्टी यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा असल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. तसेच या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Konkan Ro-Ro Ferry : मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो'नंतर मोठा निर्णय! मिळणार दोन नवे थांबे; जाणून घ्या सविस्तर