T20 world Cup च्या चॅम्पियन टीमवर पैशांचा पाऊस, रिकाम्या हाताने जाणाऱ्या टीमला किती कोटी मिळणार? पाकिस्तानही मालामाल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 world Cup Prize Money : यंदाच्या वर्ल्ड कपसाठी आयसीसीने एकूण 13.5 मिलियन डॉलर (सुमारे 123.77 कोटी रुपये) इतका मोठा प्राइज मनी निश्चित केला आहे. गेल्या 2024 च्या वर्ल्ड कपच्या तुलनेत या रकमेत सुमारे 20 टक्क्यांची वाढ आहे.
advertisement
1/7

आयसीसी मेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून, रविवारी होणाऱ्या फायनल मॅचनंतर विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव होणार आहे. आयसीसीने यंदा आपला सर्वात मोठा पेटारा उघडलाय.
advertisement
2/7
यंदाच्या वर्ल्ड कपसाठी आयसीसीने एकूण 13.5 मिलियन डॉलर (सुमारे 123.77 कोटी रुपये) इतका मोठा प्राइज मनी निश्चित केला आहे. गेल्या 2024 च्या वर्ल्ड कपच्या तुलनेत या रकमेत सुमारे 20 टक्क्यांची वाढ आहे.
advertisement
3/7
रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीमला 3 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 27.50 कोटी रुपये मिळणार आहेत. टीम इंडिया ही रक्कम जिंकू शकते.
advertisement
4/7
तर, उपविजेत्या ठरणाऱ्या टीमला 1.6 मिलियन डॉलर (सुमारे 14.67 कोटी रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. पराभूत टीमला सुमारे 13 कोटी रुपयांचा फटका बसेल.
advertisement
5/7
दुसरीकडे, सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीम्सनाही रिकाम्या हाती परतावे लागणार नाही. या दोन्ही टीम्सना प्रत्येकी 0.79 मिलियन डॉलर (सुमारे7.24 कोटी रुपये) दिले जातील.
advertisement
6/7
एवढंच नाही तर स्पर्धेत शेवटपर्यंत संघर्ष करणाऱ्या संघांना त्यांच्या कामगिरीचे योग्य फळ मिळेल. पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर राहणाऱ्या टीम्सना प्रत्येकी 3.48 कोटी रुपये मिळणार आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तानचा संघ देखील रिकाम्या हाताने गेला नाही. पाकिस्तान नशिबाने सुपर 8 मध्ये पोहोचला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाला 3.48 कोटी रुपये मिळणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 world Cup च्या चॅम्पियन टीमवर पैशांचा पाऊस, रिकाम्या हाताने जाणाऱ्या टीमला किती कोटी मिळणार? पाकिस्तानही मालामाल!