TRENDING:

Weight Loss : तासंतास रनिंग किंवा हेव्ही वेट उचलण्याची गरज नाही, फक्त रोज 30 मिनिटं करा 'हे' वर्कआऊट

Last Updated:
Workout for quick weight loss : आपल्या वजनाविषयी किंवा फिटनेसविषयी हल्ली लोक खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे ते जिममध्ये हेव्ही वर्कआऊट करतात. रोज तासंतास फिरायला जातात. यामुळे फिटनेस नक्कीच साधली जाते, मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे एक वर्कआऊट सांगणार आहोत, जे खूप सोपे आणि प्रभावी आहे.
advertisement
1/11
तासंतास रनिंग किंवा हेव्ही वेट उचलण्याची गरज नाही, रोज 30 मिनिटं करा हे वर्कआऊट
हल्ली बरेच फिटनेस एक्सपर्टस एका सोप्या पण प्रभावी पद्धतीबद्दल आवर्जून सांगत आहेत. सोशल मीडियावरही या पद्धतीबद्दल खूप बोललं जात आहे. यासाठी तुम्हाला फक्त 30 मिनिटे इनक्लाइन ट्रेडमिलवर चालायचे आहे.
advertisement
2/11
होय, चढावर चालल्याने सामान्य चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात आणि चरबी वेगांने बर्न होऊ लागते. हे धावण्याइतके अवघड नाही. परंतु तितकेच प्रभावी देखील मानले जाते. योग्य पद्धतीने हे केल्यास काही आठवड्यांत शरीराच्या आकारात बदल होऊ शकतो.
advertisement
3/11
ट्रेडमिलवर इनक्लाइन सेटिंग्जवर चालणे म्हणजे थोडक्यात चढावर चालणे. इनक्लाइनवर चालण्यासाठी तुमच्या मांड्या, कंबर आणि कोर स्नायूंना अधिक काम करावे लागते. म्हणूनच फिटनेस कोच त्याला "लो-इम्पॅक्ट, हाय-इंटेन्सिटी" कार्डिओ म्हणतात.
advertisement
4/11
तज्ञांच्या मते, इनक्लाइनवर चालणे शरीराच्या प्रमुख स्नायूंना एकाच वेळी सक्रिय करते, ज्यामुळे कॅलरी जास्त बर्न होतात आणि चरबीचे ऑक्सिडेशनही वाढते. म्हणूनच ही पद्धत वजन कमी करण्याचा शॉर्टकट म्हणून ट्रेंडिंग होत आहे.
advertisement
5/11
30 मिनिटांचे इनक्लाईन वॉक रूटीन योग्य पद्धतीने करावे. तज्ञांच्या मते, अचानक जास्त इनक्लाईनने सुरुवात करू नये. शरीराला हळूहळू जुळवून घेऊ देणे महत्वाचे आहे. 30 मिनिटांचा व्यायाम करण्यासाठी तुम्ही एक पद्धत वापरू शकता.
advertisement
6/11
पहिले 5 मिनिटे इनक्लाईन 1-2, वेग अंदाजे 3 किमी/तास ठेवा. त्यानंतर पुढील 5 मिनिटे इनक्लाईन 4-5, वेग 3.5 किमी/तास. त्यापुढील 5 मिनिटे इनक्लाईन 7-8, वेग 3.8 किमी/तास असावा. पुढचे 5 मिनिटं इनक्लाईन 9-10, वेग 4 किमी/तास ठेवा आणि त्यानंतरचे अंतिम ८ मिनिटं हळूहळू इनक्लाईन आणि वेग कमी करून आराम करा.
advertisement
7/11
हा पॅटर्न शरीराला धक्का न लावता चरबी जाळण्यास मदत करतो. बरेच जिम प्रशिक्षक याला "माउंटन वॉक" रूटीन देखील म्हणतात. यामुळे वाढलेल्या कॅलरीज बर्न होतात. चढावर चालल्याने शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. कॅलरी बर्न सामान्य चालण्यापेक्षा जास्त होते.
advertisement
8/11
इनक्लाईन वॉकमुळे मांडी, नितंब आणि वासरांचे स्नायू सतत सक्रिय असतात. नियमित सराव केल्याने या भागात कडकपणा येऊ शकतो. यामुळे हृदय गती नियंत्रित पद्धतीने वाढते, कार्डिओ फिटनेस सुधारते. ज्यांना धावणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. इनक्लाईन वॉक केल्याने शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे पोट आणि कंबरेचे स्नायूंदेखील सक्रिय होतात.
advertisement
9/11
मात्र तज्ज्ञ सांगतात, हा कमी-प्रभावाचा व्यायाम असला तरी काही लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुडघे किंवा मणक्याचे गंभीर आजार असलेले लोक, अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेले लोक, हृदयरोग असलेले लोक या लोकांनी डॉक्टरांशी बोलूनच व्यायाम करावा.
advertisement
10/11
फिटनेस प्रशिक्षक म्हणतात, तुम्ही संतुलित आहार, पुरेशी झोप घेतली आणि दररोज व्यायाम केला तर तुम्हाला 3-4 आठवड्यांत शरीराच्या आकारात खूप बदल दिसेल. कंबर आणि मांड्यांभोवतीची चरबीची कमी होऊ शकते. मात्र वजन कमी करण्यासाठी कॅलरी संतुलन, नियमितता आणि जीवनशैलीतील बदल तितकेच महत्त्वाचे आहेत.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : तासंतास रनिंग किंवा हेव्ही वेट उचलण्याची गरज नाही, फक्त रोज 30 मिनिटं करा 'हे' वर्कआऊट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल