उन्हाळ्यात वापरा ‘हे’ अत्तर अन् रहा सुगंधी; स्वस्तात मस्त करा पुण्यात या ठिकाणी खरेदी PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
एक उत्तम क्वालिटीचा परफ्यूम किंव्हा अत्तर तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. त्याचा दरवळणारा सुगंध तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो, असेही म्हणतात.
advertisement
1/6

अनेकांना परफ्यूम तसेच विविध प्रकारची अत्तरे, बॉडी स्प्रे वापरायला आवडते. पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह बनवण्यामध्ये परफ्यूम किव्हा अत्तरचा मोठा वाटा असतो, असेही म्हणतात. एक उत्तम क्वालिटीचा परफ्यूम किंव्हा अत्तर तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. त्याचा दरवळणारा सुगंध तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो, असेही म्हणतात.
advertisement
2/6
त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मस्त म्हणजेच अगदी 200 रुपयांपासून अत्तर आणि त्यापासून बनवलेले परफ्यूम कुठे मिळतील, याबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला. जाणून घेऊयात, याविषयी सविस्तर माहिती.
advertisement
3/6
<a href="https://news18marathi.com/pune/">पिंपरी चिंचवडमधील</a> आकुर्डी चौक या ठिकाणच्या ताज अत्तर आणि परफ्युम सेंटर या ठिकाणी तुम्हाला हाय क्वालिटी लाँग लास्टिंग सुगंध असलेले अत्तर मिळतील. 14 वर्ष जुने असलेले हे दुकानं आपल्या प्रसिद्ध अत्तर विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. या अत्तरांना अनेक प्रकारांत विभागले गेले आहे. फुलांचे अत्तर, मृद्गंधाचं अत्तर, हर्बल अत्तर असे हे तीन प्रकार आहेत. याठिकाणी तुम्हाला 200 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचे अत्तर मिळेल.
advertisement
4/6
हे अत्तर तुम्ही खुप दिवस वापरू शकता. शुद्ध अत्तर कधीही खराब होत नाही. अत्तर जेवढे जुने होते तेवढा त्याचा सुगंध वाढतच जातो, असेही काही अत्तर आहेत. अत्तर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ते अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या अत्तरदानीमध्ये ठेवले जाते. अत्तरपासून बनवलेले वेगवेगळे परफ्युम तुम्ही रोज वापरू शकता, अशी माहिती अत्तर विक्रेते यांनी दिली.
advertisement
5/6
उन्हाळ्यात वापरा हे अत्तर - सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात गुलाब, चमेली, खस, केवडा, मोगरासारख्या ‘थंड’ अत्तरांचा उपयोग करू शकता. उन्हाळ्यात ते शरीर थंड ठेवतात.
advertisement
6/6
अत्तर लावताना कोणती काळजी घ्यावी -अत्तर कपड्याला लागले तर, कपड्यांवर डाग पडू शकतात. त्यामुळे कपडे घालताना थेट रोलरमधून अत्तर लावणे टाळावे. एकतर कपडे घालण्यापूर्वी अत्तर लावणे चांगले किंवा कपडे घातल्यानंतर बोटावर अत्तर घेऊन ते थेट अंगावर घासावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
उन्हाळ्यात वापरा ‘हे’ अत्तर अन् रहा सुगंधी; स्वस्तात मस्त करा पुण्यात या ठिकाणी खरेदी PHOTOS