TRENDING:

धोनीने हिरा पारखला! 40 मिनिटात उडवल्या 7 विकेट्स; एकही मॅच न खेळवता CSK ने केलं होतं रिटेन, पाहा कोण?

Last Updated:
CSK boy 7 Wickets against Himachal Pradesh : एकाच मॅचमध्ये 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम करून त्याने टीम इंडियाचे देखील दरवाजे ठोठावले आहेत. या विजयामुळे त्याच्या टीमला तर फायदा झालाच, पण वैयक्तिक पातळीवर रामकृष्णने आपल्या करिअरमधील एक सर्वोत्तम टप्पा गाठलाय.
advertisement
1/7
40 मिनिटात उडवल्या 7 विकेट्स; एकही मॅच न खेळवता CSK ने केलं होतं रिटेन, पाहा कोण
विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना सीएसकेच्या स्टार खेळाडूने आपल्या बॉलिंगने अक्षरशः कहर केलाय. सीएसकेचा हा युवा खेळाडू मैदानात उतरला आणि हिमाचलच्या बॅटिंग लाईनअपचं कंबरडे मोडलंय.
advertisement
2/7
सीएसकेच्या या खेळाडूने आपल्या 9.4 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 42 रन खर्च करून तब्बल 7 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्या या भेदक माऱ्यासमोर हिमाचलचे बॅटर्स ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतलं आणि संपूर्ण टीम स्वस्तात आटोपली.
advertisement
3/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रामकृष्ण घोष आहे. रामकृष्ण घोष हा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्याने दाखवलेली ही शिस्तबद्ध बॉलिंग आगामी मोठ्या स्पर्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
advertisement
4/7
एकाच मॅचमध्ये 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम करून त्याने टीम इंडियाचे देखील दरवाजे ठोठावले आहेत. या विजयामुळे त्याच्या टीमला तर फायदा झालाच, पण वैयक्तिक पातळीवर रामकृष्णने आपल्या करिअरमधील एक सर्वोत्तम टप्पा गाठलाय.
advertisement
5/7
धोनीने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवलाय. गेल्या सीझनमध्ये गाजलेल्या मथीशा पथिरानासारख्या स्टार बॉलरला रिलीज करून चेन्नईने रामकृष्ण घोष याला टीममध्ये कायम ठेवलं होतं.
advertisement
6/7
विशेष म्हणजे रामकृष्णने अद्याप एकही आयपीएल मॅच खेळलेली नाही, तरीही कॅप्टन आणि मॅनेजमेंटने त्याच्यावर भरोसा दाखवला होता. 28 वर्षांचा हा बॉलिंग ऑलराउंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्र टीमकडून खेळतो.
advertisement
7/7
दरम्यान, गेल्या वर्षी मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याला 30 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. मात्र, त्याला एकही मॅच धोनीने खेळवली नव्हती. अशातच आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
धोनीने हिरा पारखला! 40 मिनिटात उडवल्या 7 विकेट्स; एकही मॅच न खेळवता CSK ने केलं होतं रिटेन, पाहा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल