केमिकलशिवाय घरातच पिकवू शकता आंबे, वापरा 'ही' सोपी ट्रिक, पिकतात फक्त 2 दिवसांत
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
फिरोजाबाद जिल्ह्यात स्थानिक नागरिक एक देसी जुगाड वापरून आंबे पिकवत आहेत. बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांऐवजी ते घरच्या घरी कच्चे आंबे तोडून जुनं...
advertisement
1/5

आंबा म्हटलं की, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्यात बाजारातून आंबे आणून त्यावर सगळेजण ताव मारतात. पण तुम्हाला माहित आहे का, घरीसुद्धा तुम्ही कच्च्या आंब्याला मस्त पिकवू शकता?
advertisement
2/5
लोकं वृत्तपत्र वाचून झाल्यावर फेकून देतात. पण फिरोजाबादमधील लोक याच जुन्या वृत्तपत्रांचा वापर कच्च्या आंब्यांना पिकवण्यासाठी करतात. ते काय करतात, कच्चे आंबे वृत्तपत्रात व्यवस्थित गुंडाळतात आणि दोन दिवस तसेच ठेवतात. बस! दोन दिवसांनंतर हे आंबे आपोआप पिकून तयार होतात.
advertisement
3/5
फिरोजाबादमध्ये लोक झाडावरून कच्चे आंबे तोडतात आणि घरी आणून ठेवतात. मग त्यांना पिकवण्यासाठी ही खास युक्ती वापरतात. महत्त्वाचं म्हणजे हे आंबे पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर करत नाहीत.
advertisement
4/5
फिरोजाबादमध्ये आंबे पिकवण्यासाठी हा जो देशी जुगाड वापरला जातो, त्यामुळे आंबे अगदी कमी वेळात तयार होतात. हो खरंच! तुम्ही पण कच्चे आंबे घ्या, त्यांना एका वृत्तपत्रात गुंडाळा आणि दोन दिवसांनी बघा, ते मस्त पिकलेले आणि एकदम चविष्ट लागतील.
advertisement
5/5
घरी पिकवलेले हे आंबे बाजारात मिळणाऱ्या आंब्यांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यांची चव तर एकदम लाजवाब असते आणि ते खाल्ल्यावर कसलाही त्रास होत नाही. कारण त्यांना पिकवण्यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नसतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
केमिकलशिवाय घरातच पिकवू शकता आंबे, वापरा 'ही' सोपी ट्रिक, पिकतात फक्त 2 दिवसांत