TRENDING:

Holi Shopping : होळीत रंग नाही, पैसेही कमवा! 5 रुपयांमध्ये खरेदी, 20 ला विका, मुंबईतले 4 होलसेल मार्केट

Last Updated:
मुंबईमध्ये होळीच्या साहित्याचा होलसेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर काही विशिष्ट बाजारपेठा विशेष उपयुक्त ठरतात.
advertisement
1/5
होळीत रंग नाही, पैसेही कमवा! 5 रुपयांमध्ये खरेदी, 20 ला विका, मुंबईतले 4 मार्केट
मुंबईत होळीचा सण जवळ आला की रंग, पिचकारी आणि सणासुदीच्या साहित्याची बाजारपेठ गजबजू लागते. किरकोळ विक्रेत्यांसोबतच होलसेल व्यवसाय करणाऱ्यांचीही लगबग वाढते. मुंबईमध्ये होळीच्या साहित्याचा होलसेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर काही विशिष्ट बाजारपेठा विशेष उपयुक्त ठरतात.
advertisement
2/5
दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे घाऊक खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे होळीचे रंग, पिचकारी, फुगे तसेच विविध सणासुदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. विविध पुरवठादारांमुळे दरांमध्ये स्पर्धा असल्याने व्यापाऱ्यांना योग्य किमतीत माल मिळू शकतो. येथे पिचकारी फक्त 9 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
3/5
याच परिसरातील मस्जिद बंदर हेही घाऊक बाजारपेठेसाठी ओळखले जाते. येथे प्लास्टिक वस्तू, खेळणी आणि सणासुदीच्या साहित्याचा मोठा साठा मिळतो. होळीच्या पिचकाऱ्या आणि रंगांची विविधता येथे पाहायला मिळते. येथील दुकानात पिचकारी आगदी 15 रुपयांपासून सुरू होते त्यामुळे कमी दरात मोठ्या प्रमाणात माल घेण्यासाठी हे ठिकाण सोयीचे मानले जाते.
advertisement
4/5
भुलेश्वर मार्केट हे पारंपरिक सणसामग्रीसाठी प्रसिद्ध आहे. होळीबरोबरच इतर सणांसाठी लागणाऱ्या वस्तू येथे घाऊक दरात उपलब्ध होतात. होलसेल मध्ये इथे होळीचे साहित्य आगदी 5 रुपयांपासून मिळत आहेत. किरकोळ विक्रेत्यांसाठी तसेच नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा भाग फायदेशीर ठरतो.
advertisement
5/5
काळबादेवी परिसरातील मनीष मार्केट हे घाऊक बाजार म्हणून ओळखले जाते. येथे विविध प्रकारच्या पिचकाऱ्या 15 ते 20 रुपयांपासून मिळत आहेत. बरेच आकर्षक रंगपावडर आणि मुलांसाठी खास डिझाइनची उत्पादने येथे मिळत आहेत.ट्रेंडनुसार बदलणारा माल येथे सहज उपलब्ध होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Holi Shopping : होळीत रंग नाही, पैसेही कमवा! 5 रुपयांमध्ये खरेदी, 20 ला विका, मुंबईतले 4 होलसेल मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल